रोहयोतून ८०० मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:59+5:302021-06-18T04:19:59+5:30
जवळपास तीन ते चार वर्षांपासून जुगनाळा येथील मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. हातावर पोट असणाऱ्या ...
जवळपास तीन ते चार वर्षांपासून जुगनाळा येथील मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. पण ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेकडो मजुरांच्या हाताला रोजगार मिळाल्याने अनेकांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक समस्या मिटणार आहे. या मजुरांमध्ये तरुण, शिक्षित युवकांचा सुद्धा देखील समावेश आहे. सदर कामाचे भूमिपूजन शुक्रवार सरपंच लक्ष्मी लालाजी सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच गोपाल ठाकरे, सदस्य चंद्रशेखर मेश्राम, अशोक लेनगुरे, पंढरी तोंदरे, नंदा बगमारे, कुंता कसारे, प्रगती ठाकरे, प्रतिभा ढोरे, आर. एन. कामडी, रोजगार सेवक भागवत दोनाडकर, मंगेश देवतळे उपस्थित होते.
===Photopath===
170621\img-20210617-wa0057.jpg
===Caption===
रोजगार हमी योजना चा शुभारंभ करताना