प्रधानमंत्री कौशल्य केंद्रातून युवकांना रोजगाराच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:28 PM2018-04-08T23:28:22+5:302018-04-08T23:28:22+5:30
देशातील शिक्षित बेरोजगार युवकांमधील अंगभुत कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशातील शिक्षित बेरोजगार युवकांमधील अंगभुत कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ तसेच प्रधानमंत्री कौशल्य केंद्राच्या माध्यमातून देशभरात कौशल्यप्राप्त युवकांची उभारणी करीत आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात केंद्र सरकार वाटचाल करीत आहे. येत्या काळात कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास ना. हंसराज अहीर यांनी केला.
चंद्रपूर येथील बालाजी वॉर्ड परिसरातील बजाज तंत्रानिकेतन महाविद्यालयाजवळील गजानन भवन येथे रविवारे प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन ना. अहीर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, ज्येष्ठ नेते विजय राऊत, जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, नगरसेविका संगीता खांडेकर, गजानन मोगरे, रिजनल हेड अक्षय पोहेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर रितेश पॉल, सेंटरहेड ग्लाडविन अल्फान्सो आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अक्षय पोहेकर यांनी केले. या प्रधानमंत्री कौशल्य केंद्रात १२० प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली.