शहर स्वच्छतेसह महिला बचत गटांचे असेही सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:01+5:302021-02-12T04:26:01+5:30

भद्रावती : शहराच्या स्वच्छतेसोबतच महिला बचत गटांचे सक्षमीकरण नगरपरिषदद्वारे होत आहे. सार्वजनिक शौचालय देखभाल, नाली, रस्ता सफाई कामात बचत ...

Empowerment of women self help groups along with city sanitation | शहर स्वच्छतेसह महिला बचत गटांचे असेही सक्षमीकरण

शहर स्वच्छतेसह महिला बचत गटांचे असेही सक्षमीकरण

googlenewsNext

भद्रावती : शहराच्या स्वच्छतेसोबतच महिला बचत गटांचे सक्षमीकरण नगरपरिषदद्वारे होत आहे. सार्वजनिक शौचालय देखभाल, नाली, रस्ता सफाई कामात बचत गटाचा सहभाग करून घेणारी भद्रावती नगरपरिषद ही महाराष्ट्रातील पहिलीच असल्याचे शासनाच्या अहवालात नमूद केले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर व न. प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

या सर्व कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरण देण्यात आले असून त्यांना आयुष्यमान भारत योजना अंतर्गत लाभ देण्यात येत आहे.

संपूर्ण भद्रावती शहरातील ओला व सुका कचरा घराघरातून संकलन करण्याचे काम समता व तनवी महिला बचत गटाला देण्यात आले आहे. या प्रकारचे काम फक्त बचत गटाला देणारी भद्रावती नगरपरिषद ही पहिलीच आहे.

भद्रावती नगरपरिषद अंतर्गत ४५५ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व बचत गटांवर नियंत्रण ठेवण्याकरिता नऊ वस्ती स्तर संघाची स्थापना करून त्यांची धर्मादाय आयुक्त कार्यालयातून नोंदणी करण्यात आली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याकरिता एक शहरस्तर संघ स्थापन करण्यात आला आहे. जोखमीचे व स्वच्छतेचे काम करणारे पाच पुरुषांचे बचत गट सुद्धा तयार करण्यात आले आहे. तसेच तीन दिव्यांग पुरुषांचे बचतगट सुद्धा तयार करण्यात आले आहे.

नगरपरिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात बचत गटाला वस्तू विक्रीकरिता स्टॉल, ६ दुकान गाळे उपलब्ध करून देण्यात आले. या सोबतच वस्तू विक्री करिता शहर उपजीविका केंद्र, गरीब व गरजू नागरिकांना मंडप बिछायत केंद्र, तसेच माणुसकीची भिंत इत्यादी उपक्रम भद्रावती नगरपरिषदेद्वारे महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. या कामासाठी महिला बचत गटाला विविध पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहे. उन्नती वस्ती स्तर संघाला एक लाख रुपयांचा उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला. यासह विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे.

बाॅक्स

महिलांना रोजगाराभिमुख कामे

बचत गटातील महिला घर ते घर कचरा संकलन करून डंपिंग ग्राउंडवर नेऊन त्याचे विलगीकरण करणे, शौचालयाची देखभाल करणे, नालेसफाई, रोड सफाईची काम करणे, गृह उद्योग तसेच मूंगवडी, पापड, लोणचे, लांब पोळी, शेवई तयार करणे, टेराकोटा व मातीपासून विविध शोभेच्या वस्तू तयार करून विकणे, मिरची विक्री व कांडप चक्की, झुणका भाकर केंद्र चालविणे, चहा कँटिन, तीन चाकी ऑटो, किराणा दुकान चालवणे, ब्युटी पार्लर, शिवणकाम केंद्र चालवणे इत्यादी प्रकारचे व्यवसाय करून आपले जीवनमान उंचावले आहे. महिला बचत गटांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने नगरपरिषदेतर्फे बचत गटाला विविध कामे देण्यात आलेली आहेत.

Web Title: Empowerment of women self help groups along with city sanitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.