उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:06 PM2018-10-10T22:06:31+5:302018-10-10T22:09:49+5:30
सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
राजु गेडाम।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहरातील ५० खाटांच्या रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचाराकरिता येतात. मात्र ७० ते ७५ रुग्णांवर बेडअभावी खालीच उपचार करण्याची वेळ आली. १०० खाटांचा प्रस्ताव धुळखात आहे. २४ तास रुग्णसेवा केल्याने वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची मानसिकता ढासळत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. उपजिल्हा रुग्णालयात १ वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिकारी व १२ परिचारिकांची पदे मंजूर आहेत. प्रदीर्घ काळानंतर वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरण्यात आले. सध्या डॉ. बाबर हे पदावर कार्यरत आहेत. मात्र वैद्यकीय अधिकारी तीन आणि १२ पैकी सात परिचारिकाच कार्यरत असल्याने कामांचा ताण वाढला. वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची पाच पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकाºयांची ताराबंळ उडत आहे. वैद्यकीय अधिकाºयांना २४ तास सेवा द्यावी लागत असल्याने त्यांचीही मानसिकता बिघडत असल्याचे दिसून येते. रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांची मानसिकता ठिक असली पाहिजे. मात्र, कामाचा भार अद्याप कमी झाला नाही. आंतर रुग्णालयात ५० बेडची व्यवस्था असल्याने दररोज येणाºया रूग्णात वाढ होत आहे. परिणामी, बºयाच रुग्णांवर खालीच उपचार करावा लागत आहे. बाह्य रुग्णालयात सुमारे ७०० रुग्णांची नोंद होत असल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाला आहे.
रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाकडे १०० खाटाच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याला तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालयात मंजूर असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरल्यास तालुक्यातील हजारो रुग्णांची हेळसांड थांबू शकते.
ुुुुु रूग्णांच्या संख्येनुकसार वैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. रिक्त पदे भरल्यास ताण कमी होऊन योग्य सेवा देण्यास उपयुक्त ठरेल.
-डॉ. सुर्यकांत बाबर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, मूल