पं.स.मधील अभ्यागत कक्ष रिकामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:40 PM2018-12-30T22:40:34+5:302018-12-30T22:41:00+5:30
पोंभूर्णा पंचायत समितीला सु-सज्ज अशी इमारत असून पंचायत समितीतील सर्व विभागाच्या कार्यालयासाठी पर्याप्त आहे. या इमारत बांधकामासाठी शासनाला जवळपास एक कोटी रूपयांचा खर्च आल्याचे बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून कळते. यातील फर्निचरसाठी एक कोटी ८२ लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याचे ऐकिवात आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जेंव्हा या इमारतीचे लोकार्पन झाले, तेंव्हा या इमारतीत बाहेरून येणाऱ्या लोकांना विश्रांतीसाठी शानदार 'अभ्यागत कक्ष' लोकांच्या सेवेत होते. परंतु आता पंचायत समितीतील अभ्यागत कक्षाला त्यातीलच एका विभागाच्या अतिक्रमनाचे ग्रहण लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोंभूर्णा पंचायत समितीला सु-सज्ज अशी इमारत असून पंचायत समितीतील सर्व विभागाच्या कार्यालयासाठी पर्याप्त आहे. या इमारत बांधकामासाठी शासनाला जवळपास एक कोटी रूपयांचा खर्च आल्याचे बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून कळते. यातील फर्निचरसाठी एक कोटी ८२ लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याचे ऐकिवात आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जेंव्हा या इमारतीचे लोकार्पन झाले, तेंव्हा या इमारतीत बाहेरून येणाऱ्या लोकांना विश्रांतीसाठी शानदार 'अभ्यागत कक्ष' लोकांच्या सेवेत होते. परंतु आता पंचायत समितीतील अभ्यागत कक्षाला त्यातीलच एका विभागाच्या अतिक्रमनाचे ग्रहण लागले आहे.
पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत ३१ ग्रामपंचायती असुन ७१ गावांचा यात समावेश आहे. रोज शेकडो नागरिक पंचायत समिती कार्यालयात आपल्या कामकाजासाठी येतात. परंतु त्या नागरिकांचे दुर्भाग्य असे, की पंचायत समिती इमारतीत बांधण्यात आलेला त्यांच्या हक्काचा 'अभ्यागत कक्ष'आज त्यांच्या सेवेत नाही. पंचायत समिती तील 'रोजगार हमी योजना 'विभागाने लोकांना विश्रांतीसाठी असलेल्या अभ्यागत कक्षात आपले कार्यालय थाटले आहे.
एवढेच नाही, तर तेथील बसायच्या खुर्च्याही बाहेर काढून टाकण्यात आल्या आहेत.
पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच हे कार्यालय असल्याने पंचायत समितीतील पदाधिकाºयांना किंवा येथील वरिष्ट अधिकाºयांना याची कल्पना नसेल असे नाही. गावखेड्यातून येणाºया सामान्य नागरिकांच्या मुलभूत हक्काशी त्यांचे काही एक देणे घेणे नसावे, असा प्रत्यय येत आहे.
ज्या लोकांनी मोठ्या उत्साहाने आपल्या आवडीचे पदाधिकारी निवडले. याच पदाधिकाºयांकडून या ग्रामीण भागातील जनतेला लाथाडल्या जात असल्याचे चित्र आहे. जणू काही या सामान्य नागरिकांच्या समस्या व हक्कांशी यांचे काहीच देणे घेणे नाही. लोकांना विश्रांतीसाठी बांधलेले हक्काचे अभ्यागत कक्ष हिरावून घेतल्या जात असेल, तर पदाधिकाºयांच्या शाही कक्षात या सामान्यांची किती कदर केली जात असेल, असा प्रश्न आता सामान्य नागरिकातून विचारला जात आहे. सत्ता ही परिवर्तनवादी असते, हे विसरून चालणार नाही. आज पंचायत समिती प्रशासनाने सामान्य नागरिकांची विश्रांती हिरावली आहे. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.
त्यामुळे सदर अभ्यागत कक्ष तत्काळ रिकामा करावा व जनतेच्या सेवेत द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख आशिष कावटवार यांनी दिला आहे. या संदर्भात संवर्ग विकास अधिकाºयांना निवेदनही देण्यात आले आहे.