तळोधी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:46+5:302021-08-22T04:30:46+5:30

तळोधी बा : तळोधी बा. व बाम्हणी स्मशानभूमी गट क्र. २४७ व गट क्र. २४६ वर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ...

Encroachment on the bottom cemetery deleted | तळोधी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविले

तळोधी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविले

Next

तळोधी बा : तळोधी बा. व बाम्हणी स्मशानभूमी गट क्र. २४७ व गट क्र. २४६ वर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले होते. गावकऱ्यांच्या मागणीवरून ग्रामपंचायतीच्या वतीने जागेची मोजणी करण्यात आली. त्यानंतर तळोधी बा. स्मशानभूमीच्या गट क्र .२४७ असलेले अतिक्रमण हटविण्यात आले.

या जागेवर नांगरे बंधूंनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रम सोडण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. वारंवार अतिक्रमणधारकाकडून जागा सोडण्यास विरोध होत असल्यामुळे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतच्या सरपंच छाया मदनकर व उपसरपंच राजेश घिये यांनी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महसूल विभाग व पोलीस विभाग यांना बोलावून तळोधी बा. स्मशानभूमीच्या ३३ आर जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी तळोधीचे मंडल अधिकार राऊत, तळोधीचे तलाठी शेरकी, ग्रामविकास अधिकारी आदे, उपसरपंच राजेश घिये, ग्रामपंचायत सदस्य जिवेश सयाम, ग्रा. पं. सदस्य सुधाकर कामडी, ग्रा. पं. सदस्य नरेंद्र खोब्रागडे, ग्रा. पं. सदस्य महेश नंदनवार, किशोर कटारे आदी उपस्थित होते.

210821\153-img-20210821-wa0024.jpg

अतिक्रमण हटवितानाचा फोटो

Web Title: Encroachment on the bottom cemetery deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.