चंद्रपुरातील अतिक्रमण, कचरा हटविण्याची समस्या दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:38 PM2018-07-24T22:38:15+5:302018-07-24T22:38:37+5:30

महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच नवीन दोन जेसीबी मशीन खरेदी करण्यात आल्याने अतिक्रमण हटविणे व कचरा उचलण्याची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Encroachment in the Chandrapur, the problem of removal of garbage will be overcome | चंद्रपुरातील अतिक्रमण, कचरा हटविण्याची समस्या दूर होणार

चंद्रपुरातील अतिक्रमण, कचरा हटविण्याची समस्या दूर होणार

Next
ठळक मुद्देजेसीबी मशीन खरेदी : भाड्याने मशीन घेण्याचा मनपाचा प्रश्न मिटला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच नवीन दोन जेसीबी मशीन खरेदी करण्यात आल्याने अतिक्रमण हटविणे व कचरा उचलण्याची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते मंगळवारी या मशीनचे पूजन करण्यात आले. मनपाकडे स्वत:चे बॅकहो लोडर नसल्याने भाड्याने घ्यावे लागत होते. यावर होणारा आर्थिक खर्चदेखील परवडण्यासारखा नव्हता. यामध्ये बचत करण्यासाठी आयुक्त काकडे यांनी नवीन मशिन्स खरेदी करण्याची सुचना केली होती. त्यानुसार मनपा स्वच्छता विभागातर्फे केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जेम पोर्टलद्वारे या दोन मशिन्सची आॅनलाईन खरेदी करण्यात आली आहे. सदर मशीन फोर व्हील ड्राईव्ह व जीपीएस प्रणालीयुक्त असून यामध्ये अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
अतिक्रमण काढणे, खड्डे खणणे, डम्पिंग यार्डवरील कचरा उचलणे इत्यादी विविध कामांसाठी या मशीनची आवश्यकता भासते. मनपाकडे स्वत:ची बॅकहो लोडर मशीन असल्याने खर्चात बचत होणारच आहे मनपाला साधनांसाठी इतरत्र अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्यास मदत मिळणार आहे. यावेळी स्थायी समिती सभापती राहुल पावडे, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, प्रभारी उपायुक्त गोस्वामी, शहर अभियंता बारई, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) नितीन कापसे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मडावी, माकोडे व अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आर्थिक खर्चात बचत
मनपाकडे स्वत:ची जेसीबी मशीन नसल्याने आतापर्यंत भाड्याने आणावे लागत होते. त्यामुळे मशीनधारक मालकाला पैसे देण्याची वेळ आली. यातून मनपाच्या तिजोरीवर भार पडला होता. शहरातील वाढती लोकसंख्येला अनुसरून नागरी सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च होतात. अशा परिस्थितीत भाड्याने मशीन घेणे परवडणारे नव्हते. यावर कायमचा पर्याय म्हणून प्रशासनाने दोन जेसीबी मशीन विकत घेतले, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.

Web Title: Encroachment in the Chandrapur, the problem of removal of garbage will be overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.