‘ती’ अतिक्रमित जमीन वन विभागाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:35 PM2017-12-26T23:35:46+5:302017-12-26T23:36:43+5:30

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळील अतिक्रमित जमिनीचा ताबा न्यायालयाने वन विभागाला दिला.

The 'encroachment' land belongs to the forest department | ‘ती’ अतिक्रमित जमीन वन विभागाचीच

‘ती’ अतिक्रमित जमीन वन विभागाचीच

Next
ठळक मुद्देन्यायालयाचा आदेश : वन विभागाकडून विसापूरच्या जागेवर रोपवन सुरू

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळील अतिक्रमित जमिनीचा ताबा न्यायालयाने वन विभागाला दिला. परिणामी या जागेवर आता वन विभागाने रोपवनाचे काम सुरु केले आहे
विसापूर गावाजवळील जुना भूमापन सर्वे क्रमांक ३०५/१, नवीन सर्वे क्रमांक ४५९/१ या वनविभागाचे जागेपैकी २ हेक्टर जागेवर देवकुमार बुध्दलाल धामणे यांनी अतिक्रमण केले होते. याशिवाय अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान, संयुक्त दिवाणी न्यायाधिशांनी (वरिष्ठ स्तर) ही जमीन वनविभागाची असल्याचा आदेश जारी केला आहे. संबंधित जमीन प्रकरणातील प्रतिवादी मध्य चांदा उपवनसंरक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार उपवनसंरक्षक यांनी प्रस्ताव सादर केला होता. ही जागा वनविभागाची असून वनखंड क्र ५७९, जुना सर्वे क्र ३०५/१ आणि नवीन सर्वे क्र ४५९/१ मधील दावा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात सुरू होता. परंतु, सदर प्रकरण ठरवून दिलेल्या शासन निकषात बसत नसल्यामुळे वादी देवकुमार धामणे यांची मागणी अमान्य करून प्रकरण निकाली काढण्यात आले. प्रकरणाचा निकाल वनविभागाच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेत डिसेंबर २०१७ पासून नवीन रोपवन घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणात शासनाकडून अधिवक्ता शरद आंबटकर यांनी काम बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय वनविभागाच्या बाजूने लागल्याने या ठिकाणी रोपवनाचे काम सुरू करण्यात आले, अशी माहिती मध्य चांदा उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी दिली आहे. चंद्रपूर वनविभागाने विविध पुराव्यांचा आधार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे रोपवनासोबतच बॉटनिकल गार्डनच्या कामाला सुरुवात झाली आहे.

Web Title: The 'encroachment' land belongs to the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.