बिबी पांदण रस्त्याचे अतिक्रमण अखेर दूर
By admin | Published: April 23, 2017 01:10 AM2017-04-23T01:10:47+5:302017-04-23T01:10:47+5:30
गेल्या १० वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले बिबी पांदण रस्त्यारील अतिक्रमण शेवटी सांमजस्याने
विजया डोहेंचा पाठपुरावा : रामचंद्र चुदरीकडून जमीन दान
गडचांदूर : गेल्या १० वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले बिबी पांदण रस्त्यारील अतिक्रमण शेवटी सांमजस्याने दूर करण्यात आले. या रस्त्यावर झोपड्या बांधून अतिक्रमण करण्यात आले होते.
२००८ पासून बिबी पांदण रत्यावर सहा जणांनी झोपड्या बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. त्याविरोधात नागरिकांनी अनेकदा निवेदन दिले. तसेच उपोषणदेखील केले. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. तरीही तोडगा निघाला नव्हता. मागील दोन वर्षांपासून नगरसेविका विजया होडे यांनी संमस्याने हे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु काही आग लावू लोकांनी ते होऊ दिले नाही. त्यामुळे नगरसेविका डोहे व गटनेता नीलेश ताजने यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. त्यांनी उपोषण केल्यावर प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अतिक्रमणधारक स्वत: हून अतिक्रमण काढण्यास तयार झाले. त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून जागा मागितली असता पत्रकार नासीरभाई, कय्यूमभाई, अरुण डोहे यांनी रामचंद्र चुदरी यांची भेट घेऊन प्रत्येकाला ५०० चौरस फूट जागा देण्याची विनंती केली. नासीरभाई यांनी उपविभागीय अधिकारी खिरटकर व ठाणेदार रोकडे, गटनेता नीलेश ताजने, नगरसेविका विजया डोहे, कय्यूमभाई, अरुण डोहे, रामचंद्र चुदरी, नगर परिषदचे अधिकारी, अतिक्रमणधारक यांची बैठक घेतली. तेथे चुदरी यांनी जागेचे बक्षीसपत्र लिहून दिले. ते बक्षीस पत्र अतिक्रमणधारकांना खिरटकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जागा दान दिल्याबद्दल दानकर्ते रामचंद्र चुदरी यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)