एकाकी ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय सुरूच

By admin | Published: January 26, 2016 12:43 AM2016-01-26T00:43:37+5:302016-01-26T00:43:37+5:30

आयुष्याच्या संध्याकाळी जन्म दिलेल्या मुलांनीच नाकारल्यानंतर एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा कायदा लालफीतशाहीत अडकला आहे.

Endless injustice to the lone senior citizens | एकाकी ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय सुरूच

एकाकी ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय सुरूच

Next

प्रशासनाचे दुर्लक्ष : एकटे राहणाऱ्या ग्रामीण नागरिकांची नोंदच नाही
सिंदेवाही : आयुष्याच्या संध्याकाळी जन्म दिलेल्या मुलांनीच नाकारल्यानंतर एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा कायदा लालफीतशाहीत अडकला आहे. शहर व ग्रामीण भागात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. दरम्यान जन्मदात्यावर अन्याय सुरू असल्याचा प्रकारात वाढ झाल्याचे दिसते.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आयुष्याच्या उतरत्या वयात वाढत आहे. मुलांचा आधार मिळेल, या आशेत असताना मुलांनी जन्मदात्यांना आई-वडिलांनाच घराबाहेर काढण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाला मान्यता दिली होती. हे धोरण तालुकास्तरावर राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. ग्रामपंचायत असो नगर परिषद उद्यानाची स्थापना करणे त्यामध्ये महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांकरीता स्वच्छता गृहाची व्यवस्था करणे, विरगुंळा व स्मृतीभ्रंश केंद्राची स्थापना, वृद्धांना मोफत वाहतूक सुविधा आरोग्य शिबिर आयोजित करणे सर्व जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थावर सोपविण्यात आली असताना देखील यांची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याची खंत एका ज्येष्ठ वयोवृद्धाने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Endless injustice to the lone senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.