आरक्षणाची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:46 AM2018-12-11T00:46:01+5:302018-12-11T00:46:28+5:30

महाराष्ट्र राज्यात धनगर समाज अनुसूचित जमाती (एसटी) च्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही. तसेच राज्यात मराठा समाजास आरक्षण दिले असून महाराष्ट्र राज्यात शासकीय नोकरी भरती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Enforce the reservation | आरक्षणाची अंमलबजावणी करा

आरक्षणाची अंमलबजावणी करा

Next
ठळक मुद्देधनगर समाजाची मागणी : त्यानंतरच नोकर भरती राबवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यात धनगर समाज अनुसूचित जमाती (एसटी) च्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही. तसेच राज्यात मराठा समाजास आरक्षण दिले असून महाराष्ट्र राज्यात शासकीय नोकरी भरती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार धनगर समाजास अनुसूचित जमाती (एसटी) चे आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मेगाभरती करण्यात येवू नये, अशी मागणी धनगर समाजाने केली आहे.
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्या अधिवेशनात धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करावे. तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट केल्यानंतर मेगाभरती घेण्यात यावी, ही विनंती महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरतर्फे करण्यात आली आहे. असे न केल्यास संभाव्य परिणामाला शासन जबाबदार राहील, असेही समाजाने म्हटले आहे.
उपरोक्त मागण्यांची अंमलबजावणी करण्याकरिता महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष योगीराज बापुराव उगे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव चिडे, मल्हार सेना चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष गौरव नवले, अहिल्या महिला संघ चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष पपिता येडे, महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश बुचे, उपाध्यक्ष नंदकिशोर शेरकी, महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, जिल्हा चंद्रपूरचे सरचिटणीस डॉ. नामदेव ढवळे, राजकुमार आक्कापलीवार, दत्तात्र येडे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Enforce the reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.