राजकीय पुढारी पॅनल बनविण्यात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:51+5:302020-12-17T04:52:51+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात १५ जानेवारीला ६२९ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे ग्रामपातळीवरही ...
चंद्रपूर : जिल्ह्यात १५ जानेवारीला ६२९ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे ग्रामपातळीवरही त्याचे पडसाद उमटतील, अशी शक्यता असताना जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी आता स्वतंत्र पॅनल उभे करून आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अधिकाधिक ग्रामपंचायतीवर आपली सत्ता मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राजकीय पक्ष तसेच गावातील पॅनल आता एकदिलाने कामाला लागले आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची अधिकाधिक ग्रामपंचायतीवर सत्ता होती. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय नेत्यांनी आता गावाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर गावपातळीवरील राजकीय वातावरण बदलतील, अशी चर्चा आहे. मात्र हे सर्व स्थानिक नेत्यांवरच अवलंबून असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी सावध भुमिका घेतली असून अजूनही आपले पत्ते खोलले नाही. मात्र तालुकापातळीवर बैठकांचा धुराळा उडत आहे. यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेनेनेही पदाधिकारी कार्यकर्त्याचा बैठकी घेणे सुरु केले आहे. असे असले तरी महाविकास आघाडीचा फार्मुला गावात होणे शक्य नसल्याचे बोलल्या जात आहे.
मतदान
१५ जानेवारी
मतमोजणी
१८ जानेवारी
तालुकानिहायाय होऊ घेतलेल् ग्रामपंचायतीची संख्या
चंद्रपूर
राजुरा
मूल
पोंभूर्णा
सावली
ब्रह्मपुरी
जिवती
गोंडपिपरी
भद्रावती
वरोरा
नागभीड
चिमूर
सावली
सिंदेवाही
कोरपना
---बाॅक्स
स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा दबदबा
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा दबदबा आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच काही ठिकाणी शिवसेनेकडेही सत्ता आहे. दरम्यान, मागील पंचावार्षिकमध्ये अर्ध्याअधिक ग्रामपंचायतीवर भाजपचे वच्छस्व असल्याचा तसेच यावेळी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपचेच पॅनल निवडून येतील, असा दावा केला जात आहे. तर ग्रामीण पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली पकड मजबूत केली आहे. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काॅंग्रेस- कांग्रेसच्या पॅनलकडेही मागील पंचवार्षीकमध्ये सत्ता होती.
बाॅक्स
असा आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम
२३ ते ३० डिसेंबर या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांना नामनिेर्देशनपत्र सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. ४ जानेवारी ला दुपारी ३ वाजेपर्यंत आवेदन मागे घेणे, त्यानंतर चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतीम यादी जाहीर होणार आहे.
--
स्थानिक नेतृत्वाकडे पुढाऱ्यांचे लक्ष
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी गावातील स्थानिक नेतृत्व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमीका ठरतात. गावातील निवडणुकीमध्ये पुढाऱ्याचे कसब पणाला लागणार आहे. यामध्ये प्रतिष्ठेला अधिक महत्त्व दिल्या जात असल्यामुळे राजकीय विचार बाजूला सारून बहुतांश पुढाकी गावातील पॅनलकडे अधिक लक्ष देत असल्याचे बघायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका
राज्यात महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्यास्थितीत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता बैठकांचा धुराळा उडविणे सुरु केले आहे.तालुकानिहाय बैठका घेणे सुरु करण्यात आले असून गावागावात पोहचून या निवडणुकीकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.