महावितरणविरोधात अभियंत्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:21 AM2017-09-18T00:21:48+5:302017-09-18T00:21:58+5:30
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ प्रविभागातील अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्यांनी शुक्रवारी बाबूपेठ परिसरातील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ प्रविभागातील अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्यांनी शुक्रवारी बाबूपेठ परिसरातील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर आज सोमवारपासून साखळी उपोषणाला बसणार असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली.
वीज ग्राहकांना वेळेवर देयके मिळावीत, बिलिंगची गुणवत्ता सुधारावी, मीटर वाचन करणाºया एजन्सीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच टक्के मीटरचे फेरवाचन करून घेण्याचा निर्णय महावितरण सांघिक कार्यालयाने घेतला होता. यानंतर या कामासाठी विभागीय, प्रविभागीय व परिमंडलीय कर्मचाºयांची मदत घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु, येथील वरिष्ठ कार्यालयाकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता वितरण केंद्रप्रमुख अभियंता यांनी दैनंदिन जबाबदारी पार पाडत, तांत्रिक अडचणी सांभाळत पाच टक्के मीटरचे फेरवाचन, ग्राहकांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक गोळा करून ते ग्राहक क्रमांकाशी संलग्न करण्याचे अतांत्रिक कामेही अधिनस्त कर्मचाºयांच्या मदतीने पूर्ण केली. मा्र वरिष्ठ अधिकाºयांनी या कामाकरिता कुठलीही मदत न पुरविता थेट वितरण केंद्रप्रमुख अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करून निलंबनाचे पत्र दिले. पूर्वीचचा वाढलेला भार, आॅनलाइन प्रणालीचे कामकाज त्यात वरिष्ठांकडून बिगर तांत्रिक व तांत्रिक स्वरूपाची कामे करण्यास बाध्य केले जात होते. अशास्थितीत निलंबित करण्याचे पत्र प्राप्त होत असल्यामुळे अभियंत्यामध्ये अधिकाºयांविरोधात संताप व्यक्त केला होता. त्यामुळे सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, त्यानंतर काहीच फरक झाला नाही. त्यामुळे संतप्त अभियंत्यांनी प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन केले. तर आज सोमवारपासून साखळी उपोषणाला बसण्याची माहिती त्यांनी दिली.