लंच ब्रेकच्या ‘त्या’ आदेशामुळे सामान्यांमध्ये आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:50 PM2019-06-10T22:50:41+5:302019-06-10T22:51:03+5:30
शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
आता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. १८ सप्टेंबर २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारी एक ते दोन दरम्यान अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालया व्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी दुपारची जेवणाची वेळ निश्चित नव्हती. त्यामुळे जनतेशी थेट संबंध असलेल्या कार्यालयात सर्वसामान्य लोक तक्रारी व गाºहाणी घेऊन येतात. तेव्हा बरेचदा अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. याबाबत संबंधित कार्यालयात विचारणा केल्यास जेवणाची वेळ असल्याचे सांगण्यात येत होेते. विविध सरकारी कार्यालयात दुपारच्या जेवणाची वेळ कार्यालयाच्या सोयीने ठरवली जाते. त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांच्या जेवणाची वेळ निश्चित करण्याचा सरकारचा विचार होता, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
पालिका, पंचायतमध्येही लागू करावा
नगरपालिका, पंचायत समिती, महावितरण, टपाल कार्यालय, कृषी कार्यालय आदी अनेक सरकारी कार्यालयात दुपारी १ ते ३ या वेळेत अधिकारी कर्मचारी दिसत नाही. सोहब जेवायला गेले, ही नेहमीची सबब सांगितली जाते. विशेष म्हणजे, दुपारी १ ला घरी जेवायला गेलेले अनेक कर्मचारी थेट ड्युटी संपतेवेळी येतात. सर्वशासकीय कार्यालयाची हिच स्थिती आहे. त्यामुळे नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी कितपत होते, हे काही दिवसातच कळणार आहे.
विभागप्रमुखांना घ्यावी लागणार दक्षता
नवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाºयांसाठी दुपारच्या भोजनासाठी दुपारी १ ते २ या दरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारच्या जेवणासाठी अधिकारी व कर्मचारी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेणार नाही. एकाच विभाग अथवा शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाही, याची कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आदेश जारी केले.