महिनाभरापासून ते प्रवेशद्वार तिथेच पडलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:30+5:302021-05-25T04:31:30+5:30
कोरपना : येथील तालुका क्रीडा संकुलनातील लोखंडी प्रवेशद्वार रस्त्यातच पडले आहे. त्याची दुरुस्ती करून लावण्यात यावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून ...
कोरपना : येथील तालुका क्रीडा संकुलनातील लोखंडी प्रवेशद्वार रस्त्यातच पडले आहे. त्याची दुरुस्ती करून लावण्यात यावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
महिनाभरापूर्वी जोरदार वादळ झाल्याने सदर प्रवेशद्वार पडले. तेव्हापासून ते प्रवेशद्वार रस्त्यातच पडून आहे. त्याला वेल्डिंग केल्यास ते पुन्हा उपयोगात येऊ शकते. परंतु याकडे क्रीडा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्चून तयार केलेले हे प्रवेशद्वार भंगारात जमा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने वेळीच क्रीडा विभागाचे याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. आधीच क्रीडा संकुलनातील क्रीडा भवन असेच दुर्लक्षितपणामुळे नासधूस झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी शासनाचा व्यर्थ गेला आहे. तेव्हा आतातरी यावर जागरूकतेने वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे