तरुण-तरुणींसाठी उद्यमिता प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:34 AM2021-09-07T04:34:13+5:302021-09-07T04:34:13+5:30
युवकांमध्ये उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नोकरीच्या शोधात येण्याऐवजी त्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रेरणादायक आणि सक्षम बनवून योग्य दिशेने ...
युवकांमध्ये उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नोकरीच्या शोधात येण्याऐवजी त्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रेरणादायक आणि सक्षम बनवून योग्य दिशेने एक पाऊल उचलायला प्रेरित करणे हे या प्रकल्पाचे ध्येय आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींनी उद्यमिता प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी ७५३००५७५७५ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रोग्राम ऑफिसर शंतनू भडवळकर यांना दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भय्याजी येरमे यांनी कळविले आहे.
--------
एक लिटर पॉलिथीनमधून ५०० मि.ली दुधाचे वाटप
चंद्रपूर : शासकीय दूध योजना, चंद्रपूर येथील ५०० मि.ली पॉलिथीन पिशवीचा साठा संपल्यामुळे ३ सप्टेंबरपासून १००० मि.ली च्या पॉलिथीन पिशवीमध्ये ५०० मि.ली दुधाचे वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे शासकीय दूध योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
--------
आदिवासी लाभार्थींना शबरी घरकुल योजना
चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर कार्यालयांतर्गत सन २०२१-२२ या वर्षाकरिता शबरी आदिवासी घरकुल लक्षांक प्राप्त झाला असून प्रकल्पांतर्गत, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, वरोरा व भद्रावती या पाच तालुक्यांतील गरजू आदिवासी लाभार्थींकडून शबरी आदिवासी घरकुल योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. शबरी आदिवासी घरकुल योजनेचे अर्ज शासकीय आश्रमशाळा, शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह तसेच कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध आहेत.
आदिवासी लाभार्थींनी शासकीय अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहातील मुख्याध्यापक, गृहपाल तसेच कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घ्यावेत. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, गाव नमुना आठ अ, ग्रामसभेचा ठराव, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबुकची झेरॉक्स, इलेक्ट्रिक बिल, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, घरटॅक्स, पाणीपट्टी पावती, विधवा घटस्फोटित असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, सद्य:स्थितीत राहत असलेल्या घराचा फोटो, नजिकच्या काळातील पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दि. ८ ऑक्टोबरच्या आत प्रकल्प कार्यालयात पोहोचतील याप्रमाणे सादर करावेत व शबरी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के. ई. बावनकर यांनी केले आहे.