लस घेतली असेल तरच आजपासून वेकोलित कामगारांना एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:09+5:302021-08-01T04:26:09+5:30
माजरी(चंद्रपूर) : सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे लस बंधनकारक नाही. स्वेच्छेने घेऊ शकता, असे आदेश असूनही वेकोलि ...
माजरी(चंद्रपूर) : सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे लस बंधनकारक नाही. स्वेच्छेने घेऊ शकता, असे आदेश असूनही वेकोलि प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवत १ ऑगस्टपासून लस न घेतलेल्या कामगारांची हजेरी लागणार नाही. लस घेणे बंधनकारक असल्याचा फतवाच नोटीस बोर्डवर लावला आहे. वेकोलिच्या असंख्य कामगारांनी अद्याप लस घेतलेली नाही. सोमवारी १ ऑगस्ट रोजी वेकोलि व्यवस्थापन लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन्ट्री देते वा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वेकोलीच्या ५० टक्केपेक्षाही कमी कामगारांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले आहे. वेकोलि माजरी क्षेत्रातील कोळसा खाणीत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या अंदाजे २४०० च्या घरात आहे. या कंपनीत खासगी काम करणाऱ्यांची संख्याही दोन हजारांवर आहे. वेकोलिच्या सुमारे हजाराच्या आसपास कर्मचाऱ्यांनीच लस घेतलेली आहे. यापेक्षा दुपटीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही. वेकोले माजरीतील खासगी कर्मचाऱ्यांमध्येही अंदाजे १० टक्केच लोकांनी लस घेतल्याचे बोलले जात आहे. असे असताना माजरी वेकोलिच्या खाण प्रबंधकांनी १ ऑगस्टपासून लस न घेतलेल्या कामगारांना कामावर घेतले जाणार नसल्याचे पत्र सर्व नोटीस बोर्डवर लावले आहे. यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
कोट
वेकोलि माजरीच्या सर्व कामगारांना लस घ्यायची आहे. आजपर्यंत ९०० ते १००० कामगारांनी लस घेतली आहे. अजून भरपूर जणांचे लसीकरण बाकी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयातून लस लावावी, असे पत्र आहे.
- डॉ. पाटकर, क्षेत्रीय मुख्य चिकित्सक, वेकोली माजरी क्षेत्राची
कोट
कोविड १९ प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. यामुळे इतर कामगार कोरोना बाधित होणार नाही. सर्व कामगारांना लस घेणे बंधनकारक केलेले आहे. असे वेकोलि मुख्यालय नागपूरचे पत्र आहे. एखाद्या कामगारांना आरोग्यविषयक अडचण असल्यास त्याला यातून सुट मिळू शकते. इतरांना लस घ्यावी लागणार आहे. अन्यथा, त्यांना १ ऑगस्टपासून कामावर घेणे शक्य होणार नाही.
- राजेश नायर, उपमहाप्रबंधक (कार्मिक) वेकोलि, माजरी क्षेत्र.
310721\screenshot_2021_0731_145412.png
आज पासून लस घेतली असेल तरच हाजरी
अनेक वेकोली कर्मचारी नी अजून लस घेतलीच नाही