महिलांसाठी पर्यावरण जागृती प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:38+5:302021-08-21T04:32:38+5:30
स्वयंसाहाय्यता समूहातील महिला व कॅडर यांच्यासाठी हे प्रशिक्षण देवपायली व किटाळी(बोर.), आलेवाही, जीवनापूर, घोडाझरी या ठिकाणी हे पर्यावरण ...
स्वयंसाहाय्यता समूहातील महिला व कॅडर यांच्यासाठी हे प्रशिक्षण देवपायली व किटाळी(बोर.), आलेवाही, जीवनापूर, घोडाझरी या ठिकाणी हे पर्यावरण जाणीव जागृती प्रशिक्षण पार पडले. या वेळी प्रशिक्षक म्हणून प्रकल्पप्रमुख संजय करकरे, संपदा करकरे, बबन मडावी, चरणदास शेंडे, राजपाल श्रीरामे उपस्थित होते. जंगलालगतच्या गावातील कुटुंबाची उपजीविका जंगलावर अवलंबून असते. आपण आपली उपजीविका करताना कशा प्रकारे करावी, वन्यप्राण्यांपासून आपण स्वतःचा बचाव कसा करावा, जंगल वाचविणे का आवश्यक आहे, या बाबींवर या प्रशिक्षणादरम्यान चर्चा करण्यात आली. या प्रशिक्षणाकरिता तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड येथील अमोल मोडक, शुभम देशमुख, दीपक गायकवाड, सुनील निहाटे, किशोर मेश्राम, अमोल जीवतोडे उपस्थित होते.
200821\img-20210818-wa0007.jpg
प्रशिक्षण घेतांना महिला