व्याघ्र संवर्धनातून पर्यावरणाचे संतुलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:13 PM2018-07-29T23:13:16+5:302018-07-29T23:13:53+5:30
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलव्याप्त जुनोना येथे रविवारी इको-प्रो व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमाने रॅली काढून ‘व्याघ्र संवर्धनातूनच राहणार पर्यावरणाचे संतुलन’ हा संदेश देण्यात आला. यावेळी जुनोना ग्रामपंचायत संरपच मालती कुळमेथे, इको-प्रो अध्यक्षव मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष शाम पेटकुले, वनरक्षक विजय विमलवार उपस्थित होते.
Next
ठळक मुद्देजागतिक व्याघ्र दिन : इको-प्रो व वनव्यवस्थापन समितीकडून जागृती
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलव्याप्त जुनोना येथे रविवारी इको-प्रो व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमाने रॅली काढून ‘व्याघ्र संवर्धनातूनच राहणार पर्यावरणाचे संतुलन’ हा संदेश देण्यात आला. यावेळी जुनोना ग्रामपंचायत संरपच मालती कुळमेथे, इको-प्रो अध्यक्षव मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष शाम पेटकुले, वनरक्षक विजय विमलवार उपस्थित होते.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून संयुक्त वनव्यवस्थापन व व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’ ही घोषणा देवून नागरिी.कांचे लक्ष वेधले. रॅलीनंतर जुनोना ग्रामपंचायत सभागृहात व्याख्यान पार पडले. मानद वन्यजीव रक्षक धोतरे यांनी जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्षाची कारणे विशद करून उपाययोजनेची माहिती दिली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वाघाचे महत्त्व समजावून सांगितले. वाघ-मानव संघर्ष टाळण्यासाठी जंगलावर निर्भर असणाऱ्या नागरिकांना शासनाने सोईसुविधा पुरविल्या पाहिजे. शिवाय व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व योजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्याचे धोरण तयार करण्याची गरज व्यक्त केली.
शाम पेटकुले यांनी वन व्यवस्थापन समितीचे कार्य आणि गावकºयांची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. गावकºयांनी जंगलाचे संरक्षण करण्यासोबतच वन्य प्राण्यांच्या अधिवासाची काळजी घेण्याचेही त्यांनी नमुद केले.
येत्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायत, संयुक्त वनव्यवस्थापन समिती व इको-प्रो जुनोना शाखा मिळून गाव विकास, वन, वन्यजीव संरक्षण, स्वच्छता, निसर्ग पर्यटन विकासासाठी कार्य करण्याची संधी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून कार्य करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष टिकेदार, सविता वेलादी, माया बोरूले, मीना मुद्दलकर, इको-प्रो जुनोना शाखाचे सदस्य किशोर पेटकुले, गुरूदास भोयर, शैलेश मुडपल्लीवार, अनिकेत जेंगठे, प्रशांत मांढरे, सोनाली पेंदाम, दिनेश कन्नाके, संजय वाढई चंद्रपूर इको-प्रो पदाधिकारी बिमल शहा, राजु काहिलकर, हरीश मेश्राम, सुधीर देव, सुनिल लिपटे, वैभव मडावी, आशिष म्हस्के, अतुल राखुंडे, आयुषी मुल्लेवार, सारीका वाकुडकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रीन प्लॉनेट सोसायटी, सार्डतर्फे जागृती पत्रक वाटप
चंद्रपूर : वनातून जाणाऱ्या महामार्गावर अंडर पासेस व गतिरोधक नसल्याने वाघ आणि वन्यजीवांचे अपघाती मृत्यू होत आहेत. ग्रीन प्लानेट सोसायटी व सार्ड संस्थेच्या वतीने जागतिक व्याघ्र दिनानिम्त्ति चंद्रपूर-मूल मार्ग, महापालिका व वन नाक्याजवळ वाहनधारकांना ‘वाघ व वन्यजीव वाचवा’ असे संदेश देणारी पत्रके वाटण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, सार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कामडे, प्रा. डॉ.योगेश दुधपचारे, प्रा सचिन वझलवार,दिनेश खाटे,भाविक येरगुडे, विलास माथनकर, स्वप्नील राजूरकर,नितीन मत्ते, प्रवीण राळे,महेंद्र राळे, कमलेश व्यवहारे,संदीप वडते, संचिता मत्ते आदी उपस्थित होते. वनातून जाणाºया महामार्गावर उपाय योजना करण्याची कार्यकर्त्यांनी केली.