पर्यावरणस्रेही विकासाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:10 AM2018-06-10T01:10:49+5:302018-06-10T01:10:49+5:30
महानिर्मितीच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन केले जात आहे. मात्र, पर्यावरणाचीही काळजी घेतली असून पर्यावरणस्रेही विकास आज काळाची गरज आहे, असे मत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानिर्मितीच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन केले जात आहे. मात्र, पर्यावरणाचीही काळजी घेतली असून पर्यावरणस्रेही विकास आज काळाची गरज आहे, असे मत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केले. महाऔष्णिक विद्युत केंद्राने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पार पडलेल्या दोन दिवसीय जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्य अभियंता जयंत बोबडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक श्रीमाळी यांनी महानिर्मितीच्या पर्यावरणस्नेही विकासासोबतच पर्यावरण धोरणांची मांडणी केली. पर्यावरणाच्या संरक्षण व सुधारणेसाठी तीन कलमीय कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने विद्युत केंद्रातून वापरलेल्या पाण्याचे शुन्य विसर्ग, एमओईएफ व सीसीप्रती युनिट पाणी वापरण्याचा मानक साध्य करणे, एमपीसीबी, एमओईएफ, सीसी मानकानुसार एसपीएम पातळी मर्यादित करण्यासाठी सर्व ईएसपी फिल्ड ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त ठेवणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञानात्मक सुधारण करून स्वच्छ व सुंदर पर्यावरण कायम ठेवण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची माहिती दिली. वीज निर्मितीसाठी प्रती युनिट कोळसा वापर कमी करणे, सयंत्र उर्जा वापर कमी करणे, कोळसा वाघिणी रेल्वे विलंबशुल्क शून्य करणे, कार्यस्थळ स्वच्छता, प्रसन्नता, नवकल्पना आदींचा या कार्यक्रमात समावेश आहे. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत केंद्राच्या पर्यावरण संबंधी सद्यस्थितीचे सादरीकरण आणि पाठपुरावा दर महिन्याला केला जातो. महानिर्मितीचे वरिष्ठ व्यवस्थापन हे पर्यावरण दूताची भूमिका पार पाडत आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे खुशाल अवचरमल, सुरेंद्र कारणकर, बाळकृष्ण सांगळे जलबिरादरीचे संजय वैद्य, डॉ. टी. डी. कोसे उपस्थित होते. संचालन तेजस्विता तवाडे, कीर्ती चन्ने व वैशाली चौधरी यांनी केले. विजय येऊल यांनी आभार मानले.