ऑनलाईन पीक नोंदणीत नेटवर्कचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:47+5:302021-09-06T04:31:47+5:30

शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज ...

Erase the network in online crop registration | ऑनलाईन पीक नोंदणीत नेटवर्कचा खोडा

ऑनलाईन पीक नोंदणीत नेटवर्कचा खोडा

Next

शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या नोंदणीच्या आधारावरच शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पूर्वी ही नोंदणी तलाठ्यांकडून केली जायची; परंतु आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतातील बांधावरूनच पीक नोंदणी करता येते, तसेच पिकांचे फोटोसुद्धा अपलोड करता येतात. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही नेटवर्कची मोठी समस्या आहे. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी मोठी अडचण होत आहे.

बॉक्स

या आहेत समस्या

पीक नोंदणी करताना अँड्राॅईड मोबाईल गरजेचा आहे. मात्र, ग्रामीण भागात ७५ टक्के नागरिकांजवळ अँड्राॅईड मोबाईल नाही, तसेच बहुतांश शेतकरी अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना मोबाईलचे नॉलेज नाही. काही शेतकऱ्यांना पीक पेऱ्यांची प्रक्रिया माहिती नाही, तर ग्रामीण व डोंगराळ भागात नेटवर्कची समस्या नेहमीच असते. त्यामुळे अडचण होत आहे.

बॉक्स

अशी करा पीक नोंदणी

अँड्राॅईड मोबाईलवरून क्यूआरकोड स्कॅन करून किंवा प्ले स्टोअरवरून पीक पाहणी ॲप डाऊनलोड करता येतो. त्यानंतर तेथे आपली वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करायची. त्यानंतर मोबाईलवर आलेला चारअंकी क्रमांक भरावा. त्यानंतर पीक पेरणीची माहिती भरावी. पिकाचा फोटो अपलोड करावा. जेवढी पिके असतील त्या सर्वांची नोंदणी करावी. जर यामध्ये अडचण येत असल्यास तलाठी किंवा कृषी सहायकांशी संपर्क करावा. नोंदणीमध्ये पीक पेरणीनंतर दोन आठवड्यांत वाढलेले पीक, पिकांची पूर्ण वाढलेली अवस्था, कापणीपूर्वीची अवस्था समाविष्ट करता येणार आहे.

Web Title: Erase the network in online crop registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.