राजोली परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा
By admin | Published: October 6, 2016 01:34 AM2016-10-06T01:34:28+5:302016-10-06T01:34:28+5:30
भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे.
राजोली : भारत संचार निगम या भारताच्या अग्रण्य दुरसंचार कंपनीची सेवा गेल्या काही महिन्यापासून पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासिन आणि हलगर्जी कारभारामुळे राजोली परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिय दुरसंचार केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याबरोबर बीएसएनएलची दूरसंचार सेवा ठप्प पडत असून मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतात. या केंद्रातील स्वयंचलीत बॅटरी सिस्टम नादुरूस्त असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत झाला, तरीही सेवा ठप्प पडलेलीच असते. त्यामुळे आॅनलाईन सोबत जोडलेल्या शासकीय, निमशासकीय बँक आणि खासगी कार्यालयातील कामकाज बंद पडलेले असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत असते. ही बाब संबंधीत अधिकाऱ्याना माहित असूनही त्याकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे ग्राहकात बोलले जात आहे. महिन्याच्या मुदतीतील विविध प्रीपेड प्लान ग्राहकांनी रिचार्ज केलेले असतात. परंतु येथील दूरसंचार सेवा १५ ते २० दिवसच सुरू राहत असल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
मूल तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या उदासिन व बेजबाबदार प्रवृत्तीचा प्रत्यय येत असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी बीएसएनएल मोबाईल धारकांनी केली आहे. (वार्ताहर)