रोटरी क्लबतर्फे हिंदी दिनानिमित्त निबंध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:20+5:302021-09-21T04:31:20+5:30
चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरतर्फे हिंदी दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चंद्रपूर पब्लिक स्कूल, ...
चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरतर्फे हिंदी दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चंद्रपूर पब्लिक स्कूल, चांदा पब्लिक स्कूल, नूतन हायस्कूल चंद्रपूर, प्रियदर्शिनी कन्या विद्यालय, घुग्घुस, हिंदी सिटी स्कूल चंद्रपूर, रफी अहमद किदवई हायस्कूल येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहा शाळांनी भाग घेतला. रोटरी सभागृहात आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुरलीमनोहर व्यास, कल्पना पलिकुंडवार, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना कल्पना पलिकुंडवार म्हणाल्या की, हिंदी राष्ट्रभाषा असतानाही तिला पाहिजे त्या प्रमाणात मान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तर मुरली मनोहर व्यास यांनी इंग्रजी भाषेच्या वर्चस्वामुळे इंग्रजी भाषेचा कल आणि हिंदीला हीन भावनेने बघण्याची वृत्ती, याबाबत दु:ख व्यक्त केले. संचालन अजय पालारपवार, श्रीकांत रेशिमवाले, सेक्रेटरी संतोष तेलंग यांनी केले. कार्यक्रम स्व. उषादेवी खंडारकर व स्व. देवीदास सोनटक्के यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनुद यादव यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. स्पर्धेसाठी निखिल तांबेकर, रोडमल गहलोत, अशोक हसानी यांनी विशेष प्रयत्न केले.