पारडी येथे वन पर्यटन केंद्राची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:22 AM2020-12-26T04:22:59+5:302020-12-26T04:22:59+5:30

--- परसोडा ते मांगरूळ मार्ग रखडलेलाच कोरपना : परसोडा येथून तेलंगणा राज्यातील मांगरुळ गावाला जोडणारा मार्ग स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही ...

Establish a forest tourism center at Pardi | पारडी येथे वन पर्यटन केंद्राची निर्मिती करा

पारडी येथे वन पर्यटन केंद्राची निर्मिती करा

Next

---

परसोडा ते मांगरूळ मार्ग रखडलेलाच

कोरपना : परसोडा येथून तेलंगणा राज्यातील मांगरुळ गावाला जोडणारा मार्ग स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही रखडलेला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अधिकचे अंतर मोजून जावे लागते. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेता, या मार्गाची तातडीने निर्मिती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-----

कोरपना येथे विज्ञान महाविद्यालय स्थापन करा

कोरपना : तालुक्याचे स्थान असलेल्या कोरपना येथे विज्ञान व वाणिज्य पदवी, पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना गडचांदूर, वणी, राजुरा, वरोरा,चंद्रपूर येथे जावे लागते. गोरगरीब विद्यार्थ्यांना येथे जाणे येणे आर्थिक दृष्ट्या परवडण्याजोगे नाही. तसेच या स्थानी महाविद्यालय झाल्यास तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी सोयीचे होईल.

यामुळे याठिकाणी महाविद्यालयाची स्थापना करणे गरजेचे आहे.

Web Title: Establish a forest tourism center at Pardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.