राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श प्रस्थापित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:54 PM2018-06-10T23:54:03+5:302018-06-10T23:54:45+5:30

चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यात वेकोलिच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात २९ ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

Establish the ideal of Chandrapur district in the state | राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श प्रस्थापित करा

राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श प्रस्थापित करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ५० जलशुद्धीकरण संयंत्रे देखभाल व दुरूस्तीसाठी महिला बचतगटांना हस्तांतरीत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यात वेकोलिच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात २९ ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्यात येतील. यासाठी सरकारचा कोणताही निधी न वापरता हा प्रयोग राबविणार आहोत. पाण्याचा योग्य वापर, त्याचे योग्य व्यवस्थापन हे कौशल्य मातृशक्तीला योग्य पध्दतीने अवगत असल्याने महिला बचतगटांना व्यवस्थापनाचा भार सोपविण्यात आला आहे. महिला बचतगटांनी ही जबाबदारी प्रभावीपणे राबवून राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा आदर्श प्रस्थापित करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात रविवारी आयोजित हस्तांतरण प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये भेल व महानिर्मीती कंपनीच्या सीएसआर निधीतून जलशुध्दीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) बसविण्यात आले आहेत. ही संयंत्रे देखभाल, दुरूस्ती व संचलन यासाठी महिला बचतगटांना हस्तांतरीत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, रोशनी खान, वनीता आसुटकर, पंचायत समिती सदस्य केमा रायपूरे, रामपालसिंग, प्रमोद कडू आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात ५० महिला बचतगटांपैकी काही महिला बचतगटांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्यवरांच्या हस्ते हस्तांतरण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच जिल्ह्यातून दहावीमध्ये प्रथम आलेली साक्षी मारोती वराटकर, द्वितीय आलेली गौरी प्रविण भोयर, तृतीय अंजली राजेश विचुरकर, चौथी गुंजन यादवराव खराबे, पाचवी सेजल सुनील आयलनवार तर सहावी किशोरी दशरथ राजुरकर या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी तर प्रास्ताविक मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले.
गावकऱ्यांना शुद्ध व थंड पाणी मिळणार
महिला बचत गटांना जलशुद्धीकरण संयंत्रांच्या देखभाल व दुरूस्तीच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. या जलशुद्धीकरण संयंत्रांच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाण्यासह थंड पाणी देण्यात येणार आहे. यादृष्टीने संयंत्राला चिलर बसविण्यात आल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Establish the ideal of Chandrapur district in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.