कोरपन्यात उपविभागीय कार्यालय स्थापन करा

By admin | Published: November 26, 2015 12:52 AM2015-11-26T00:52:54+5:302015-11-26T00:52:54+5:30

तेलंगणा व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथे तालुका निर्मितीला ....

Establish a sub-divisional office in Korpan | कोरपन्यात उपविभागीय कार्यालय स्थापन करा

कोरपन्यात उपविभागीय कार्यालय स्थापन करा

Next

प्रशासकीय कामाला येणार गती : लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष द्यावे
कान्हाळगाव : तेलंगणा व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथे तालुका निर्मितीला २५ वर्षाचा प्रदीर्घ कालखंड लोटूनही जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वगळता एकाही विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले नाही. परिणामी संबंधित कामे एकाच ठिकाणी होण्याऐवजी तालुकावासीयांना ससेहोलपट करावी लागत आहे.
याठिकाणी महसूल, कृषी, बांधकाम, विद्युत, सिंचाई, पाटबंधारे, पोलीस, डाक, दूरसंचार, पाणीपुरवठा आदी विभागाची उपविभागीय कार्यालय नसल्याने नागरिकांना राजुरा, गडचांदूर, नांदा येथे जावून आपली कामे करावी लागत आहे. यातील काही कार्यालये तालुका मुख्यालयी असण्याऐवजी गडचांदूर, नांदा येथे स्थापन्यात आल्याने एका ठिकाणी होणाऱ्या कामाला दोन चकरा जास्तीच्या माराव्या लागत आहे.
पूर्वी कोरपना तालुका हा राजुरा तालुक्यात असल्याचे येथील अनेक उपविभागीय कार्यालये येथे आहे. यात महसूल, कृषी, सिंचाई, पाटबंधारे, डाक, दूरसंचार, वन पाणी पुरवठा आदी उपविभागांचा समावेश आहे. परंतु राजुऱ्याचे अंतर अधिकचे आणि वेळ, आर्थिक बाब खर्ची घालणारी आहे. त्यामुळे ही संपूर्ण कार्यालये स्वतंत्र करुन कोरपन्यात स्थापने गरजेचे आहे.
कोरपना तालुका हा आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, अविकसित म्हणून ओळखला जात असला तरी औद्योगिकदृष्टया तालुका संपन्न आहे.
या कारणाने येथील नागरिकरण झपाट्याने वाढले जात आहे. जेणेकरुन प्रशासकीय कामकाजाला गती प्राप्त होईल. नांदा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे गडचांदुरात बांधकाम विभागांनी शाखा अभियंता कार्यालय कायम ठेवावे, अशी मागणी तालुकावासियांकडून व्यक्त होत आहे.
यासाठी लोकप्रतिनिधींनी शर्तीचे प्रयत्न करण्याची गरज आहे. शिवाय याबाबीची त्वरीत पूर्तता झाल्यास कोरपन्याचाही विकास चांगल्यारितीने साधता येईल. नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लागून अनेकांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर होण्यास मदत होईल. (वार्ताहर)

Web Title: Establish a sub-divisional office in Korpan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.