म्युकरमायकोसिस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:04+5:302021-05-22T04:27:04+5:30
चंद्रपूर: म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स समिती गठित करा, प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नाक-कान-घसा व दंतरोग ...
चंद्रपूर: म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स समिती गठित करा, प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नाक-कान-घसा व दंतरोग तज्ज्ञांची टीम तयार करून घ्यावी
व जिल्हाभरात या रोगावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करावी
अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्ह्याचा आढावा घेताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना, रेती घाट लिलाव सद्यस्थिती, सातबारा संगणीकरण प्रगती अहवाल, नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारी व खरीप हंगाम पूर्वतयारी याबाबत आढावा घेतला.
कोविड आजारामुळे अनेक बालकांनी पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षण व त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर पाहणी करावी. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती मागवून घ्यावी, जे बालक अनाथ आहे आणि नातेवाईकांकडे आहे अशा बालकांची माहिती घेऊन त्यांना मदत व पुरेपूर लाभ देण्याची कार्यवाही करावी. अशा सूचनाही त्यांनी दिल्या.