पाणी पुरवठ्‌याशी संबंधित तक्रारींच्‍या निवारणासाठी तक्रार निवारण केंद्र स्‍थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:38+5:302021-05-15T04:26:38+5:30

चंद्रपूर : पाणी पुरवठा हा नागरिकांच्‍यादृष्‍टीने अतिशय संवेदनशील विषय आहे. त्‍यामुळे पाणी पुरवठ्‌याशी संबंधित तक्रारींचे निराकरण प्राधान्‍याने व्‍हावे यासाठी ...

Establishment of Grievance Redressal Center for redressal of grievances related to water supply | पाणी पुरवठ्‌याशी संबंधित तक्रारींच्‍या निवारणासाठी तक्रार निवारण केंद्र स्‍थापन

पाणी पुरवठ्‌याशी संबंधित तक्रारींच्‍या निवारणासाठी तक्रार निवारण केंद्र स्‍थापन

googlenewsNext

चंद्रपूर : पाणी पुरवठा हा नागरिकांच्‍यादृष्‍टीने अतिशय संवेदनशील विषय आहे. त्‍यामुळे पाणी पुरवठ्‌याशी संबंधित तक्रारींचे निराकरण प्राधान्‍याने व्‍हावे यासाठी बल्‍लारपूर नगरपरिषदेने तक्रार निवारण केंद्र निर्माण करून नागरिकांच्‍या समस्‍या सोडवाव्‍यात, असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहरातील पाणी पुरवठ्‌यासंबंधीच्‍या तक्रारींच्‍या अनुषंगाने ऑनलाईन आढावा बैठक घेतली. या बैठकीला बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरिष शर्मा, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता सुशील पाटील, रेणुका दुधे, नीलेश खरबडे, अजय दुबे, आशिष देवतळे, जयश्री मोहुर्ले, साखरा बेगम, येलय्या दासरप, स्‍वामी रायबरम, अरुण वाघमारे, आशा संगीडवार, अरुण भटारकर, काशीराम घोडमारे, पूनम मोडक आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी आ. मुनगंटीवार यांनी नागरिकांच्‍या तक्रारींच्‍या अनुषंगाने नगरपरिषद व महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण यांच्‍यातर्फे कार्यवाहीचा आढावा घेतला. एका महिन्‍याच्‍या आत एक्‍स्प्रेस फिडर घेण्‍याचे निर्देश सुध्‍दा त्‍यांनी दिले. नळ बिलाच्‍या व्‍याजदरात सूट देण्‍याच्‍यादृष्‍टीने निर्भयदान योजना राबविता येईल काय, यादृष्‍टीने तपासणी करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. पाणी पुरवठ्‌याशी संबंधित तक्रारींच्‍या निवारणासाठी नगरपरिषदेने सूचना फलकावर संबंधित कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर जाहीर करावेत, असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

पाणी पुरवठ्‌याशी संबंधित नागरिकांच्‍या तक्रारी प्राधान्‍याने सोडविण्‍यात येतील व आ. मुनगंटीवार यांनी दिलेल्‍या निर्देशांच्‍या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्‍यात येईल, असे नगराध्‍यक्ष हरिष शर्मा यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Establishment of Grievance Redressal Center for redressal of grievances related to water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.