माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:51 AM2018-06-08T00:51:10+5:302018-06-08T00:51:10+5:30

कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना करण्यात आली. कार्यालयाचे उद्घाटन नरेश पुगलिया यांच्या हस्ते पार पडले.

Establishment of Workers' Union at Manikgad Cement Company | माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना

माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना

Next
ठळक मुद्देनरेश पुगलिया : कामगारांवर अन्याय खपवून घेणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना करण्यात आली. कार्यालयाचे उद्घाटन नरेश पुगलिया यांच्या हस्ते पार पडले.
स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सागर ठाकूरवार, कामगार नेते जि. प. सदस्य शिवचंद्र काळे, साईनाथ बुचे, देवेंद्र गहलोत, वसंत मांढरे, अजय मानवटकर, अभय मुनोत आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया म्हणाले, माणिकगड सिमेंट व्यवस्थापन गेल्या ३० वर्षांपासून कामगारांवर सतत अन्याय करीत आहे. सध्या येथे कार्यरत पाकेट युनियन कामगारांना न्याय देण्यास असमर्थ असल्याने नव्याने कामगार संघाची स्थापना करण्यात येत असल्याचे सांगितले. कामगारांनी एकसंघ होऊन अन्यायाविरोधात लढा देण्याचे आवाहन केले. सध्याची युनियन व्यवस्थापनच्या इशारावर चालत असल्याची टीकाही यावेळी केली.
कंपनीने कामगार कपात धोरण अवलंबताना कामगारांना नियमानुसार संपूर्ण लाभ दिला पाहिजे. मात्र कंपनीने २० वर्षे काम केलेल्या कामगारांना कामावरुन काढून टाकल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी कामगार नेत्यांची भाषणे झाली. त्यांनी कामगारांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी कामगार संघाचे सहसचिव राजू बेले, उपाध्यक्ष रामरतन पांडे, कोषाध्यक्ष प्रकाश बुरडकर, दिनकर लांडे, राजकुमार छत्री, अनिता सिंग, सतीश येमचेलवार, हरी काळे आदी उपस्थित होते.
युनियन कार्यालयात वाचनालय होणार
युनियन कार्यालयामध्ये कामगारांच्या मुलांसाठी वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचे नरेश पुगलिया यांनी कार्यक्रमात सांगितले.

Web Title: Establishment of Workers' Union at Manikgad Cement Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.