प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तहसील कार्यालयापुढे ट्रॅक्टर उभे करणार

By admin | Published: January 24, 2016 12:58 AM2016-01-24T00:58:47+5:302016-01-24T00:58:47+5:30

शासकीय अधिकाऱ्यांकडून आम्हाला वेठीस धरत असून त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांनी आमचा छळ थांबवावा, ..

On the eve of the Republic Day, the tractor will be raised in front of the Tehsil office | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तहसील कार्यालयापुढे ट्रॅक्टर उभे करणार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तहसील कार्यालयापुढे ट्रॅक्टर उभे करणार

Next

प्रशासनाकडून छळ : ट्रॅक्टर असोसिएशनने दिला इशारा
राजुरा: शासकीय अधिकाऱ्यांकडून आम्हाला वेठीस धरत असून त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांनी आमचा छळ थांबवावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राजुरा तहसील कार्यालयापुढे ट्रॅक्टर उभे करण्याचा इशारा ट्रॅक्टर असोसिएशनने येथे पत्रकार परिषदेत दिला.
राजुरा परिसरातील १२ किलोमिटर परीक्षेत्रात लिज उपलब्ध करून दिल्यास ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्यांना मदत होईल. कापनगाव किंवा विहीरगाव नाल्यावर ट्रॅक्टर असोसिएशनला लिज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. राजुराचे उपविभागीय अधिकारी ट्रॅक्टर चालकांना वेठीस धरत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड ठोठावत आहेत. राजुरा आणि बल्लारपूर येथील तहसील कार्यालयापुढे शेकडो ट्रॅक्टर उभे करून निषेध करू आणि या भागात रेती घेऊन येणाऱ्या इतर वाहनांनासुद्धा रोखून धरण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
पत्रकार परिषदेला राजुरा ट्रॅक्टर चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष राजू डोहे, उपाध्यक्ष महम्मद जावेद, सचिव गजानन येरणे, कोषाध्यक्ष सूरज पडवेकर, नगरसेवक शरीफ सिद्धीकी, बंडू ठाकरे, संजय शेंडे, राजू बंडीवार, चंद्रकांत कुईटे, सोहेल खान, संजय शेरकी, धर्मेंद्र चौधरी यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: On the eve of the Republic Day, the tractor will be raised in front of the Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.