प्रवेश प्रक्रीया संपल्यानंतरही जिल्ह्यात अकरावीच्या १२२४ जागा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:59+5:302020-12-16T04:41:59+5:30
चंद्रपूर : अकरावीची प्रेवश प्रकीया संपुन बराचसा कालावधी झाला. मात्र जिल्ह्यातील महाविद्यालयातील सुमारे एक हजार २२४ जागा शिल्लक आहेत. ...
चंद्रपूर : अकरावीची प्रेवश प्रकीया संपुन बराचसा कालावधी झाला. मात्र जिल्ह्यातील महाविद्यालयातील सुमारे एक हजार २२४ जागा शिल्लक आहेत.
दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर साधारणत: चार ते पाच दिवसात अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरुवात होत असते. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे २५८ उच्च महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य, कला, एमसीव्हीसी शाखेच्या सुमारे २६ हजार ८१२ जागा आहेत. महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रीया राबविण्यात आली. प्रवेश प्रक्रीया संपूनही बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील सुमारे १२२४ जागा शिल्लक आहेत.
बॉक्स
विशेष परवानगी अतंर्गत प्रवेश शिल्लक
काही कारणास्तव विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसेल. तर त्यांना विशेष परवानगी अंतर्गत प्रवेश देण्यात येते. मात्र त्यासाठी नागपूर येथे कारण दाखवून विभागीय शिक्षण उपसंचालकाची परवानगी घेतल्यानंतर प्रवेश दिला जातो.विशेष परवानगी अतंर्गत प्रवेश शिल्लक
काही कारणास्तव विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसेल. तर त्यांना विशेष परवानगी अंतर्गत प्रवेश देण्यात येते. मात्र त्यासाठी नागपूर येथे कारण दाखवून विभागीय शिक्षण उपसंचालकाची परवानगी घेतल्यानंतर प्रवेश दिला जातो.
बॉक्स
मागील वर्षीची स्थिती
चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर अकरावीची प्रवेश प्रकीया साधारणात दहावीचा निकाल लागल्यानंतर पाच ते सहा दिवसात सुरु होते. साधारणात १५ दिवस ही प्रकीया चालू राहते. दरवर्षी विज्ञान शाखेच्या वगळता इतर शाखेच्या ७०० ते ८०० च्या जवळपास जागा शिल्लक राहतात.मागील वर्षीची स्थिती
चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर अकरावीची प्रवेश प्रकीया साधारणात दहावीचा निकाल लागल्यानंतर पाच ते सहा दिवसात सुरु होते. साधारणात १५ दिवस ही प्रकीया चालू राहते. दरवर्षी विज्ञान शाखेच्या वगळता इतर शाखेच्या ७०० ते ८०० च्या जवळपास जागा शिल्लक राहतात.