भरपूर पावसानंतरही मेथी ३०, पालक २० रुपये पेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:51+5:302021-08-12T04:31:51+5:30
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक घरात शाकाहारी जेवण बनवले जात आहे. साधारणत: अनेकांच्या घरात पालेभाज्यांचा समावेश असतो. ...
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक घरात शाकाहारी जेवण बनवले जात आहे. साधारणत: अनेकांच्या घरात पालेभाज्यांचा समावेश असतो. मात्र वाढत्या महागाईने पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने पालेभाज्या, फळभाज्या किमती वाढल्या आहेत. पावसाळा सरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र पालेभाज्यांचे दर उतरत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठेत मेथी ३० तर पालक २० रुपये पेंडीच्या दराने विक्री केली जात आहे.
बाॅक्स
पालक येतो ग्रामीण भागातून
चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे पीक घेतले जाते. शहरातील बाजारपेठेत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पालेभाज्या व फळभाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात. बाजारपेठेत पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही दर गगनाला भिडले आहेत.
कोट
गृहिणी म्हणतात
बाजारपेठेत दिवसेंदिवस भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. ही महागाई काही केल्या कमी होत नाही. निदान जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
-प्रतीक्षा रायपुरे, गृहिणी
----
कोरोनाने आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मोठी ओढाताण होत आहे.
संघमित्रा रामटेके, गृहिणी
-----
व्यापारी म्हणतात
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उकाडा वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात भाजीपाला येत नसल्याने दर वाढले आहेत.
प्रशांत रायपुरे, व्यापारी
-----
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या किमतीमध्येही थोडीफार वाढ झाली आहे. शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.
-सम्यक तेलंग, व्यापारी