मृत्यूनंतरही त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:07+5:302021-09-08T04:34:07+5:30
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांद्रा येथील हेमंत राजेंद्र चिंचोळकर या अविवाहित तरुणाचे भावजय सोनालीसोबत प्रेमसंबंध होते. तीसुद्धा ...
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांद्रा येथील हेमंत राजेंद्र चिंचोळकर या अविवाहित तरुणाचे भावजय सोनालीसोबत प्रेमसंबंध होते. तीसुद्धा बांद्रा गावात पती व दोन मुलींसह राहत होती. हेमंत व सोनाली हे दोघेही एकेदिवशी घरून पळून गेले होते. ते काही दिवसांनी परतल्यानंतर घरच्या मंडळींनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. पुन्हा काही दिवसांनी दोघांनीही घर सोडले. यानंतर मात्र त्यांचे मृतदेहच घरी परतले. दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव नजीकच्या पैनगंगा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. दोन दिवसांनी दोघांचे मृतदेह गवसले. मृत्यूनंतरही त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. हेमंतवर बांद्रा येथे तर सोनालीवर आर्मी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.