लाखो रुपये खर्चूनही चलपतगुडा तहानलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:30 AM2018-05-04T00:30:42+5:302018-05-04T00:30:42+5:30
जिवती तालुक्यातील मौजा शेडवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चलपतगुडा येथे लाखो रुपये खर्चून बोअरवेल खोदल्या. मात्र त्याला पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागत आहे.
फारुख शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : जिवती तालुक्यातील मौजा शेडवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चलपतगुडा येथे लाखो रुपये खर्चून बोअरवेल खोदल्या. मात्र त्याला पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागत आहे.
चलपतगुडा हे तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेले छोटेशे गाव आहे. गावात दोन बोअरवेल असून त्यातील पाणी आटले आहे तर एका बोअरवेलमध्ये सौर ऊर्जेचे पंप बसवण्यात आले आहे. मात्र त्या बोअरवेलमधील पाणीही कमी झाल्याने ते मागील पाच वर्षांपासून बंद आहे.
गावापासून तीन किमी अंतरावर असणाºया शेडवाही येथून भर उन्हात पाणी आणावे लागत आहे. याकडे ग्रामविकास अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे. मोठ्यांसोबत लहान मुलेही भरउन्हात पाण्यासाठी संघर्ष करतात.
मागील दहा वर्षांपासून गाव अंधारात
चलपतगुडा हे गाव मागील दहा वर्षापासून अंधारात असून याकडे विद्युत वितरण कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे. गावात विद्युत पुरवठा होता. परंतु तो बंद करण्यात आला. आतापर्यंत बंदच आहे.
शासनाने गावात टँकर सुरू करावा
शासनाने तालुक्यातील या गावाकडे गांभीर्याने लक्ष घालून गावकºयांना टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे.
- सुधाकर नागोसे ग्रामपंचायत सदस्य, भारी