तीन तासांच्या प्रतीक्षेनंतरही एस.टी.ला पुरेसे प्रवासी मिळणे दुरापास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:21+5:302021-04-28T04:30:21+5:30
प्रवाशांना घेण्याकरिता एस.टी. बसस्थानकात किंवा जिथे नेहमी अधिक प्रवासी असतात, त्या ठिकाणी वाहक व चालक एस.टी. बस उभी करतात. ...
प्रवाशांना घेण्याकरिता एस.टी. बसस्थानकात किंवा जिथे नेहमी अधिक प्रवासी असतात, त्या ठिकाणी वाहक व चालक एस.टी. बस उभी करतात. प्रवाशांची प्रतीक्षा सुरू होते. प्रवासी एस.टी. बसमध्ये आला की वाहक त्याला बसप्रवासाचे नियम सांगणे सुरू करतो. नियम ऐकताच प्रवासी एस.टी. बसमधून उतरतो. असे एकेक प्रवासी उभ्या एस.टी.तून निघून जातात. त्यामुळे पुरेसे समजले जाणारे २० प्रवासी तीन तास प्रतीक्षा करूनही मिळत नसल्याने एस.टी. बस आगारात परत पाठवली जाते. यामुळे एस.टी. महामंडळाला चांगलाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
कोट
उन्हाळ्यामध्ये एस.टी. बसने हजारो प्रवासी प्रवास करीत असल्याने या दिवसांत एस.टी.चे उत्पन्न अधिक असते; परंतु सध्याच्या कालावधीमध्ये एस.टी. बसेसना प्रवासी मिळत नसल्याने अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
डी. एम. कोलते, प्रभारी आगारप्रमुख, वरोरा.