माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:11+5:302021-07-17T04:23:11+5:30
घरातच रहाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माहेर दूर असलेल्या नवविहितांना माहेरी जाता आले नाही. आता आषाढ महिन्यामुळे यावर्षी तरी ...
घरातच रहाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माहेर दूर असलेल्या नवविहितांना माहेरी जाता आले नाही. आता आषाढ महिन्यामुळे यावर्षी तरी आपल्याला माहेरी जाता येईल, अशी अाशा नवविवाहिताना असून, त्यांना माहेरची ओढ लागली आहे.
कोरोना संकटामुळे प्रत्येकांवर निर्बंध आले आहे. विशेषत: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रत्येकांना घरात राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाले असून, रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधामध्ये दूरवर असलेल्या नवविवाहिताही अडकल्या. त्यांना माहेरी येताच आले नाही. त्यामुळे त्या माहेरी येण्यासाठी आसुसल्या आहेत. आता आषाढ महिना सुरू झाला असून, नवविवाहिताना माहेरी जाण्याचे स्वप्न रंगवित आहे. बाॅक्स
नवविवाहिता म्हणतात.....
कोरोना संकटामुळे सर्वत्र दहशत आहे. आता रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवास करून माहेरी जाणे धोक्याचे वाटत आहे. एकदाचे कोरोना संकट गेल्यानंतरच माहेरी जाण्याचा विचार करीत आहे.
-मंगला रामटेके, चंद्रपूर.
---
माझे माहेर लांब आहे. सध्या रेल्वेसुद्धा व्यवस्थित सुरू झाल्या नाही. त्यामुळे माहेरी जाण्यास अडचण आहे. प्रत्येकींनाच माहेरी जाण्याची आवड असते; मात्र सध्याची परिस्थिती वेगळी आहे. माहेरच्यांना फोनद्वारे बोलणे होते. आता नाही, पण काही दिवसांना माहेरी जाण्याचा प्लॅन केला आहे.
रूपा कोडापे
----
कोट
मुलीला भेटण्याची ओढ तर राहणारच ना!
प्रत्येक आईला मुलीला भेटण्याची ओढ राहते. मुलगी सासरी गेली की ती कशी राहणार, याबाबत चिंताही असते. लहानपणापासून सांभाळ केल्यानंतर ती सासरी गेल्यानंतर माहेरी कधी येते, याची प्रत्येक आई वाट बघतात. आता कोरोना संकटामुळे माहेरी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
वैशाली कुलकर्णी
कोट
प्रवास करणे सध्या धोकादायकच
मुलगी सासरी गेल्यानंतर मुलीला भेटण्याची तळमळ प्रत्येक आईलाच असते. आषाढ महिन्यात नवविवाहिता माहेरी येतात; मात्र आता ही पद्धत काहीशी कमी झाली आहे. मोबाइल आणि प्रवासी साधने वाढली आहेत, त्यामुळे पूर्वीसारखी आतुरता नाही; मात्र प्रत्येक आईला मुलाला भेटावे असेच वाटते. कोरोना संकटामुळे अनेक अडचणी येत आहे.
-शुभांगी मालेकर, चंद्रपूर.