यंदाही तथागतांना घराघरातूनच वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:14+5:302021-05-27T04:30:14+5:30
स्वत:सह दुसऱ्याची काळजी घेण्यासाठी बौद्ध उपासकांनी यंदाही सामूहिक बुद्ध जयंतीचे कार्यक्रम न घेताच घरोघरी बुद्ध, धम्म, संघ वंदनेचे पठण ...
स्वत:सह दुसऱ्याची काळजी घेण्यासाठी बौद्ध उपासकांनी यंदाही सामूहिक बुद्ध जयंतीचे कार्यक्रम न घेताच घरोघरी बुद्ध, धम्म, संघ वंदनेचे पठण करुन तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन केले. काही ठिकाणी धम्मध्वजारोहण तर बुद्ध विहारात सामूहिक वंदनेचे पठण करुन बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.
------
फोटो
बौद्ध समाज मंडळ, वडगाव चंद्रपूर : बौद्ध समाज मंडळ वडगावतर्फे सकाळी ९.०० वाजता वैशाख बुध्द पौर्णिमानिमित ध्वजारोहण व धम्मदेसना कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भजनदास डोईफोडे, मंडळाच्या अध्यक्ष चारुशिला ब्राह्मणे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. अरविंद तोतडे यांनी सामूहिक बुध्द वंदना घेतली. वैशाख पौर्णिमेचे महत्व मंडळाच्या अध्यक्षा चारुशिला ब्राह्मणे यांनी समजावून सांगितले. संचालन प्रशांत चहांदे यांनी केले. यशस्वीतेसाठी अभिजित तोतडे, अशोक सोनारखन, स्वप्निल इंगळे, दिलीप चिकाटे, लक्ष्य चहांदे, प्रमोद देवगडे, पंकज खांडेकर आदींनी प्रयत्न केले.