अखेर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:44 AM2020-12-15T04:44:28+5:302020-12-15T04:44:28+5:30

मूल : जिल्हाभरात पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर कंत्राटदारामार्फत पाणी पुरविण्याचे काम केले जाते. मात्र येथील कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमीत होत ...

Eventually the water supply staff got paid | अखेर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले

अखेर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले

Next

मूल : जिल्हाभरात पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर कंत्राटदारामार्फत पाणी पुरविण्याचे काम केले जाते. मात्र येथील कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमीत होत असल्याने कर्मचाऱ्यांनी श्रमिक एल्गारचे महासचिव ॲड. कल्याण कुमार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी त्यांनी कंत्राटदारासोबत चर्चा करुन पगार नियमीत मिळवून दिले.

पाणी पुरवठा विभागातर्फे कंत्राटदारमार्फत पाणीपुरवठा होता. यामध्ये टेकाडी, सोनापूर, बेंबाळ, मेंडकी, साखरी, व्याहाड बुज, बोथली, बोरचांदली, येथे पाणी पुरवठा विभागाचे फिल्टर प्लॅन्ट आहे. यावर एकूण ४४ कर्मचारी नियमित पाणी पुरवठाचे काम करीत आहेत. मात्र कर्मचारी नियमित काम करूनही कंत्राटदाराकडून पगार देण्यास विलंब व अनियमितता होत असल्याने कर्मचाऱ्यांनी श्रमिक एल्गारचे महासचिव ॲड. कल्याण कुमार यांची भेट घेवून कंत्राटदाराकडून पगार प्रत्येक महिण्यात विलंब व अनियमितता होत असल्याची समस्या मांडली. ॲड. कल्याण कुमार यांनी कंत्राटदारासोबत चर्चा करून कर्मचाऱ्यांचे पगार नियमित मिळवून दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी श्रमिक एल्गार कार्यालय चितेगाव येथे बैठक घेवून श्रमिक एल्गार संघटनेचे व महासचिव मान. ॲड. कल्याण कुमार यांचे स्वागत केले. यावेळी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची कार्यकारणी गठित करून ध्येय धोरणे ठरविण्यात आले. बैठकीला श्रमिक एल्गारचे संघटन सचिव रवी नैताम, विशाल नर्मलवार, सिंदेवाही तालुका अध्यक्ष संतोश मलकमवार यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Eventually the water supply staff got paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.