ब्रह्मपुरीची संध्या राऊत हवाई सफरची मानकरी
By admin | Published: December 12, 2015 03:28 AM2015-12-12T03:28:22+5:302015-12-12T03:28:22+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यात राबविलेल्या संस्काराचे मोती ‘जरा हटके’-२००१५ या स्पर्धेमध्ये ब्रह्मपुरी येथील
संस्कारांचे मोती : लोकमतच्या उपक्रमात मिळाली संधी
चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यात राबविलेल्या संस्काराचे मोती ‘जरा हटके’-२००१५ या स्पर्धेमध्ये ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाची संध्या सुधीर राऊत ही विद्यार्थीनी हवाई सफरची मानकरी ठरली आहे.
२०१५-१६ या शैक्षणिक सत्रात राबविण्यात आलेल्या संस्काराचे मोती ‘जरा हटके’-२००१५ या स्पर्धेमध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शाळांमधूनही पाच हजारांवर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यांची हवाई सफरसाठी लक्की ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात आली. नागपुरात पार पडलेल्या या सोडतीमध्ये ब्रह्मपुरीची संध्या राऊत भाग्यवान विजेती ठरली आहे. ती आठवा क वर्गाची विद्यार्थीनी आहे.
या सोबतच अन्य पुरस्कारांसाठीही सोडत पार पडली. त्यातील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली असून लवकरच त्यांना संबंधित शाळांमधून लोकमतच्या वतीने पाठविलेली बक्षिसे समारंभपूर्वक दिली जाणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)