प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:06+5:302021-09-26T04:30:06+5:30

चंद्रपूर : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे ...

Every citizen will get drinking water | प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल

प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल

Next

चंद्रपूर : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युव्हेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्स्फॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. बाबूपेठ येथील या योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा शनिवार, ता. २५ सप्टेंबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला.

लोकार्पण सोहळ्याला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. जुनोना मार्गावरील हिंग्लाज भवानी मंदिराशेजारी अमृत योजनेच्या झोन ७ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. येथील कामे पूर्ण झाली असून, नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा सुरू होणार आहे. गुरुवारी सकाळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या भागात नळांची पाहणी केली. त्यात पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे आढळून आले. आज पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला नगरसेवक अनिल रामटेके, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक श्याम कणकम, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेवक संजय कंचर्लावार, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, जलप्रदाय विभागाचे शाखा अभियंता संजय जोगी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे आनंद भालादरे, अमित फुलझेले, श्याम सिडाम यांची उपस्थिती होती.

Web Title: Every citizen will get drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.