कुपोषणमुक्तीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:54+5:302021-06-21T04:19:54+5:30
सुभाष धोटे : २५ कुपोषित बालकांना सकस आहार भेट राजुरा : आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश ...
सुभाष धोटे : २५ कुपोषित बालकांना सकस आहार भेट
राजुरा : आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाउंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांच्या पुढाकाराने आणि बाळू संस्थेच्या माध्यमातून राजुरा ग्रामीण आणि शहरी भागातील २५ कुपोषित बालकांना प्रत्येकी एक याप्रमाणे बाळू साहित्य किट भेट देण्यात आली.
या प्रत्येक किटमध्ये २ किलो मोट, २ किलो चणा, २ किलो मूग, २ किलो बरबटी, २ किलो वाटाणा, १ किलो नाचणी, १ किलो शेंगदाणे, १ किलो गूळ हे बाळू साहित्य भेट देण्यात आले. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कायम सेवा कार्य करीत असून, क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा आपण करीत राहणार आहोत. शिक्षण, आरोग्य, कृषी व इतर सर्व क्षेत्रात राजुरा विधानसभा क्षेत्राला प्रगतिपथावर कायम ठेवू. कुपोषण मुक्त समाजासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होणे काळाची गरज आहे. त्यामुळे या कार्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरुण धोटे, जि.प. सदस्य मेघा नलगे, उपसभापती मंगेश गुरनुले, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, पं.स. सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, वैशाली सटाले, गोंडपिपरीचे शरद पारखी, कोरपनाचे गणेश जाधव यासह कुपोषित बालक, त्यांचे आईवडील, अंगणवाडीसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन प्रा.प्रफुल्ल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक सेवा कलश फाउंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी तर आभार प्रदर्शन बाळू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांनी केले.
===Photopath===
200621\img_20210620_123954.jpg
===Caption===
वाटप करताना आमदार सुभाष धोटे