आरोग्य तपासणी शिबिरात १७७ जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:40+5:302021-01-08T05:32:40+5:30
यावेळी ॲनिमियामुक्त भारत अभियान (एएमबी) कॉर्नरचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा आरोग्य ...
यावेळी ॲनिमियामुक्त भारत अभियान (एएमबी) कॉर्नरचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विभागप्रमुख व ५१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच कोरोना आजार होऊन गेलेल्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांचे प्लाझ्मादान याकरिता नमुने घेण्यात आले. रोगनिदान शिबिरात १७७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली.
शिबिराला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कीर्ती साने, वैद्यकीय अधिकारी डॉ. मीना मडावी आदी उपस्थित होते. शिबिरात रक्तदान तपासणी, सिकलसेल, असंसर्गिक आजार तपासणी, ॲनिमियामुक्त भारत कार्यक्रमांतर्गत महिलांना हिमोग्लेाबीन वाढीकरिता गोळ्या वाटप करण्यात आल्या. यशस्वीतेकरिता आरोग्य विभागातील शालिक माहुलीकर, सुभाष सोरते, सामान्य प्रशासन विभागातील आनंद सातपुते, नितीन फुलझले आदींनी परिश्रम घेतले.