घुग्घुसच्या नेत्र चिकित्सा शिबिरात ८१२ लोकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:13+5:302021-08-02T04:10:13+5:30

घुग्घुस : येथील प्रयास हेल्थ क्लबमध्ये आयोजित नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, चश्मे वितरण व शिधापत्रिका निराधार योजनेचे वितरण व ...

Examination of 812 people in Ghughhus eye treatment camp | घुग्घुसच्या नेत्र चिकित्सा शिबिरात ८१२ लोकांची तपासणी

घुग्घुसच्या नेत्र चिकित्सा शिबिरात ८१२ लोकांची तपासणी

googlenewsNext

घुग्घुस : येथील प्रयास हेल्थ क्लबमध्ये आयोजित नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, चश्मे वितरण व शिधापत्रिका निराधार योजनेचे वितरण व व्यापाऱ्यांना फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर तथा ज्येष्ठ नागरिकांना काठीचे वितरण करण्यात आले. या शिबिराचे आयोजन भाजप शहर शाखेच्या वतीने केले होते.

उद्घाटन भाजपचे जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. यावेळी मंचावर भाजप युवामोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि.प. सभापती नीतू चौधरी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, प.सं. माजी सभापती निरीक्षण तांड्रा, माजी जि. सदस्य चिन्ना नलभोगा, माजी सरपंच संतोष नूने, प्रयास बँकेच्या अध्यक्ष किरण बोढे उपस्थित होते. शिबिरात नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ८१२ नागरिकांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५२१ रुग्णांना मोफत चश्म्याचे वितरण करण्यात येणार आहे, तसेच १२६ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.

Web Title: Examination of 812 people in Ghughhus eye treatment camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.