केंद्र शासनाच्या पथकाकडून होणार स्वच्छतेची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:20 PM2018-08-03T22:20:36+5:302018-08-03T22:21:53+5:30
देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकण ठरविण्यासाठी ‘स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत १ ते ३१ आॅगष्ट या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणांची यावेळी पाहणी करण्यात येणार आहे. १० ते १६ गावांना प्रत्यक्ष भेटीतून सर्व्हेक्षण होणार असल्याने सर्वच ग्रामपंचायतींनी सज्ज असावे, अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकण ठरविण्यासाठी ‘स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत १ ते ३१ आॅगष्ट या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणांची यावेळी पाहणी करण्यात येणार आहे. १० ते १६ गावांना प्रत्यक्ष भेटीतून सर्व्हेक्षण होणार असल्याने सर्वच ग्रामपंचायतींनी सज्ज असावे, अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.
गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांचे निरिक्षणे तसेच स्वच्छताविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेबाबतची मते घेतली जाणार आहेत. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेत स्थळावरील माहितीचा आधारही यासाठी घेण्यात येणार आहे. सर्वत्र हे सर्व्हेक्षण होणार असून सर्व्हेक्षणासाठी ग्रामपंचायतीची निवड नमुना निवड पध्दतीने सर्व्हेक्षण संस्थेकडून केली जाणार आहे. राज्यातील ३४० ते ५४४ ग्रामपंचायती मधून सर्व्हेक्षाण होणार असून राज्यात ५० लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व आॅनलाईन सहभाग घेतला जाणार आहे.
गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या आशा आणि शिक्षक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत.
स्वच्छता सर्व्हेक्षणाला १०० गुण
सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण : ३० गुण (शौचालय उपलब्धता- ५ गुण, शौचालय वापर - ४ गुण, कचऱ्याचे व्यवस्थापन- १० गुण, सांडपाणी व्यवस्थापन- १० गुण)
नागरिक तसेच मुख्य व्यक्तींची स्वच्छतेबाबतीत मते व अभिप्राय-३५ गुण (जाणीआव जागृती- २० गुण, नागरिकांचे आॅनलाईन अभिप्राय- ५ गुण, प्रभावी व्यक्तींचे अभिप्राय- १० गुण)
स्वच्छता विषयक सद्यास्थिती- ३५ गुण (स्वच्छतेचे प्रमाण- ५ गुण, हागणदारी मुक्तीची टक्केवारी - ५ गुण, हागणदारी मुक्त पडताळणी - १० गुण, फोटो अपलोडींग - ५ गुण, नादुरुस्त शौचलय उपलब्धता - १० गुण, ) अशा तीन भागात गावांची तपासणी होणार आहे.