परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के शुल्क कपात करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:18 AM2021-07-09T04:18:26+5:302021-07-09T04:18:26+5:30

सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी. विसापूर : गोंडवाना विद्यापीठाने २९ जून रोजी जारी केलेल्या निर्णयात येत्या शैक्षणिक सत्रात २०२१-२०२२ करिता ...

Examination fee should be reduced by 50% | परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के शुल्क कपात करावी

परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के शुल्क कपात करावी

Next

सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी.

विसापूर : गोंडवाना विद्यापीठाने २९ जून रोजी जारी केलेल्या निर्णयात येत्या शैक्षणिक सत्रात २०२१-२०२२ करिता विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, आव्हान, इंद्रधनुष्य, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी संघ शुल्क व अन्य प्रकारचे शुल्क १०० टक्के रद्द करण्यात आले. तसेच प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के फी सवलत देण्यात आली. परंतु परीक्षा शुल्कात मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला.

परीक्षा शुल्कात विद्यापीठाने १० टक्के कपात केली. त्यामुळे विद्यार्थी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठ जसे अमरावती, नागपूर, कोल्हापूर या विद्यापीठाने अनुक्रमे ३० टक्के, २५ टक्क्यांची कपात केली आहे. परंतु गोंडवाना विद्यापीठाद्वारे १० टक्के परीक्षा शुल्क कमी करून विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे. कोरोना महामारीच्या भयंकर विखळ्यात सापडलेला विद्यार्थी आर्थिक अडचणीवर कसाबसा मात करत परीक्षा शुल्क भरतो. परंतु विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. जिल्ह्यात अतिदुर्गम भागात असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाची गंगा पोहोचावी, या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली व अतिदुर्गम भागात असणारा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेत आहे. शासनाने या आधीच बेरोजगारीची भर विद्यार्थ्यांवर टाकली असून विद्यार्थी, पालक वर्ग कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने व गोंडवाना विद्यापीठाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची कपात करावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, बल्लारपूर तर्फे विद्यापीठ प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सम्यकचे सिद्धांत पुणेकर यांनी दिला आहे. तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उच्चशिक्षण मंत्री, राज्यपाल, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वप्निल सोनटक्के, प्रथम दुपारे, सिद्धांत पुणेकर, प्रणित चालखुरे, फारुक शेख आदी उपस्थित होते.

080721\img-20210706-wa0075.jpg

विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के शुल्क कपात करावी.

Web Title: Examination fee should be reduced by 50%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.