उत्कृष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:55 PM2018-12-19T22:55:56+5:302018-12-19T22:56:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा अधीक्षक डॉ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अभिनव कल्पणा सुरु केली आहे. यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष कार्याची दखल घेत त्यांची उत्कृष्ट व सर्वोत्तम अशी निवड करुन दर महिन्याच्या गुन्हे बैठकीमध्ये पुरस्कार व प्रशस्तिपत्र देवून गौरव करण्यात येत आहे. नुकत्याच मंथन हालमध्ये पार पडलेल्या बैठकीत उत्कृष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये नोव्हेंबर २०१८ मधील उत्कृष्ट पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोउपनी जावेद शेख, पाथरी, पोलीस अधिकारी प्रवीण मानकर, लाठी, उपविभागीय उत्कृष्ट पोलीस कर्मचारी गुलाब बल्की मूल, दीपक मून वरोरा, किशोर बोढे, चिमूर, जयंत चुनारकर तळोधी, नारायण सोनुने राजुरा, सुनील बोरीकर गडचांदूर, सुनील जांभुळकर पडोली, वाहतूक शाखेचे विष्णू नागरगोजे, स्थागुशाचे दौलत चालखुरे, जिवीशाचे संजय थेरे, मोरेश्वर देशमुख, सिंदेवाही, उत्कृष्ट डिटेक्शन रघुनाथ कळके ब्रह्मपुरी, सुनील मेश्राम गडचांदूर, प्रमोद कोटनाके वरोरा, उत्कृष्ट कनव्हिक्शन सुरेश ज्ञानबोनवार मूल, उत्कृष्ट पैरवी अधिकारी सुधाकर बुटके ब्रह्मपुरी, वामन मेश्राम चंद्रपूर शहर, उत्कृष्ट जनजागृती, कम्युनिटी पोलिसींग अमोल पुरी सायबर पोलीस स्टेशन, विकास मुंढे सायबर पोलीस स्टेशन, पोलीस प्रतिमा उंचविण्यासाठी केलेली विशेष कामगिरी उमेश पाटील वरोरा, दाशिव ढाकणे माजरी, उत्कृष्ट कनिष्ट श्रेणी लिपिक सुनील काळे पोलीस अधीक्षक कार्यालय, उत्कृष्ट वरिष्ठ श्रेणी लिपिक वंदना डोंगे पोलीस अधीक्षक कार्यालय, उत्कृष्ठ पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर दुर्गापूर, अन्नपूर्णा नन्नावरे भद्रावती, नंदलाल झिंगरे चिमुर, योगेश लोंडे ब्रह्मपुरी, अश्विनी निखाडे पोंभुर्णा, लक्ष्मण नेवारे राजुरा, सोपान मोरे गडचांदूर, उत्कृष्ट पोलीस मित्र लखन केशवाणी वरोरा, मदन शेडामे चिमुर, मिलिंद मेश्राम, ब्रह्मपुरी, चंद्रकांत बोडे मूल, तनवीर पेशट्टीवार, राजुरा, दर्शन सिडाम गडचांदूर यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांचे हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत यांनी मार्गदर्शन केले. तसेच विशेष कामगिरी करुन पोलीस ठाण्यांचे नाव उंचावावे, तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.