पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची रिसोर्स बँक देणार जादा उत्पादनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:00 AM2020-10-23T05:00:00+5:302020-10-23T05:00:17+5:30
पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पारंपरिक शेतीला टाळून जास्त उत्पन्न घेणारे आणि सतत नाविण्याचा विचार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांना शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार प्रदान केला जातो. या प्रगतीशील शेतकऱ्यांकडे इतरांना दिशा देणारे बरेच काही अनुभव गाठीशी असतात. अशा शेतकऱ्यांची रिर्सार्स बँक तयार केले जाणार आहे. या बँकेत जिल्ह्यातील प्रगतीशील पुरस्कारप्राप्त शेतकरीही सहभागी होणार आहेत.
पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना आता कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना हवा तेव्हा कृषी सल्ला मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्या हंगामात कोणती पिके घेता येतील, ते घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याला कोणती खते, किटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल, अशा प्रश्नांची उत्तरे त्यांच्या गावाजवळच मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
पिकांबद्दल शेतकऱ्यांना मिळणार तातडीने सल्ला
निसर्गच्या अवकृपेमुळे शेतकरी संकटात सापडतात. त्यामुळे शेतात कोणती पिके घ्यावी, खते, कीटकनाशके द्यावी, त्याचे मार्केट कसे असेल? अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना त्यांच्या गावाजवळच मिळावी यासाठी कृषी विभागाने पुरस्कार प्राप्त व नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची ह्यरिसोर्स बँकह्ण ची स्थापना झाली. त्याद्वारे गरजु शेतकऱ्यांना तातडीने सल्ला मिळणार आहे.
नवीन तंत्रज्ञानाची माहिती
शेतकऱ्यांना नव्याने उमेदीने पिके घेण्यासाठी कृषी सल्ल्याची गरज असते. अशावेळी कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जातात. मात्र तरीही शेतकऱ्यापर्यंत आवश्यक माहिती पोहचण्यासाठी मर्यादा येतात. याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे, असा दावा कृषी विभागाकडून केला आहे.