एक्साईजच्या ‘जागते रहो’ सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:57 PM2019-04-01T21:57:02+5:302019-04-01T21:57:17+5:30
लोकसभा निवडणुकीची रंणधुमाळी सुरु झाली असून, उमेदवारांकडून ही निवडणूक कॅश करण्यासाठी ‘मनी’, ‘मदिरा’चा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमावर्ती नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी मोहीम सुरु केली आहे. कर्तव्यावर तैनात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागते रहोच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची रंणधुमाळी सुरु झाली असून, उमेदवारांकडून ही निवडणूक कॅश करण्यासाठी ‘मनी’, ‘मदिरा’चा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमावर्ती नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी मोहीम सुरु केली आहे. कर्तव्यावर तैनात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागते रहोच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत चिन्ह वाटपाची प्रक्रिया आटोपली आहे. त्याअनुषंगाने परवानगी मिळवलेल्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. ११ एप्रिल रोजी लोकसभा मतदार संघाची निवडणूक होणार आहे. ९ एप्रिल रोजीस सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील, रिंगणात एकूण १३ उमेदवार असून त्यांना प्रचार करण्यासाठी ८ दिवस मिळणार आहेत. बहुतांश उमेदवारांचे प्रचार साहित्य, वाहने, सभांचे स्थळ आदी बारीकसारीक तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचा प्रचार आणि मतदारांच्या गाठी- भेटी घेताना बरेच परिश्रम करावे लागणार आहे. मात्र, असे असताना अनेक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मनी’, ‘मदिरा’चा वापर करण्याची शक्कल लढविली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अन्य जिल्ह्यातून दारु आणली जावू शकते. त्यामुळे जिल्ह्यात दारुची वाहतूक होऊ नये, यासाठी एक्साईजने प्रत्येक वाहनांची सुक्ष्म तपासणी करणे सुरु केले आहे. जिल्हा सीमावर्ती भागात वाहनांची नोंद देखील करण्यात येत आहे. त्यामुळे जाणारी वाहने कोठून, कोठे चालली, हे सहजतेने लक्षात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीच्या अनुषंगाने अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहे.