वीज बिल माफ करा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:18 AM2021-07-09T04:18:32+5:302021-07-09T04:18:32+5:30
बल्लारपूर : मागील काही महिन्यांपासून येथील महावितरण कंपनीने लोकांचे वीज कनेक्शन खंडित करणे सुरू केले. ते थांबवा नाही तर ...
बल्लारपूर : मागील काही महिन्यांपासून येथील महावितरण कंपनीने लोकांचे वीज कनेक्शन खंडित करणे सुरू केले. ते थांबवा नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की स्थानिक जनता मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून अडचणीत सापडली आहे. यामुळे अवाच्या सवा आलेले विजेचे बिल माफ करा, राज्य सरकार वीज बिल माफ संदर्भात निर्णय घेईपर्यंत लोकांच्या घरांचे कनेक्शन खंडित करू नका. येत्या पाच दिवसात वीज खंडित करण्याची प्रक्रिया थांबवली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने बल्लारपुरात जण आंदोलन पुकारण्यात येईल. निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, भिवराज सोनी, ॲड.किशोर पुसलवार,रवीकुमार पुप्पलवार, अफजल अली, ॲड.पवन वैरागडे, आसिफ शेख, निलेश जाधव, सुधाकर गेडाम, समशेरसिंग चव्हाण, राकेश वडस्कर यांची उपस्थिती होती.
080721\-aap.jpg
निवेदन देताना आप चे कार्यकर्ते