प्रदर्शनातून महिलांना प्रोत्साहन मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:46 PM2018-03-04T23:46:53+5:302018-03-04T23:46:53+5:30
महिलांच्या अंगी अनेक कलागुण असतात. त्यांचे कौशल्य जगासमोर येण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू प्रदर्शन गरजेचे असते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महिलांच्या अंगी अनेक कलागुण असतात. त्यांचे कौशल्य जगासमोर येण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू प्रदर्शन गरजेचे असते. तसेच महिलांनी आपल्या कौशल्यातून तयार केलेल्या वस्तूची विक्री केल्यानंतर त्याचा आर्थिक स्तर उंचावत असतो. असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.
स्थानिक राजीव गांधी सभागृहात इनरव्हिल क्लब आॅफ स्मार्ट सिटीच्या वतीने वस्तू प्रदर्शनी व विक्री मेळावा नुकताच पार पडला. यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना पलिकुंडवार, क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग, फाऊंडर अध्यक्ष डॉ. विद्या बांगडे, सचिव नंदा कळस्कर, शफिक अहमद, रोटरीचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, क्लबचे सेक्रेटरी जयस्वाल, डॉ. प्रमोद बांगडे, निर्मल गर्ग, डॉ. किरण देशपांडे, किरण खांडरे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना क्लबच्या अध्यक्ष गर्ग म्हणाल्या, आजची महिला ही प्रत्येक क्षेत्रात पुढे गेली आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक असा मंच उपलब्ध करुन देण्याची गरज असते. हिच बाब हेरुन क्लबच्या वतीने महिलांसाठी वस्तू प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ५० स्टॉल लावण्यात आले होते. दरम्यान बचत गटातील महिलांनी तसेच दिव्यांग महिलांनी अनेक गृहपयोगी वस्तूचे स्टॉल लाऊन त्यांची विक्री करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जीनी गर्ग, नियाज कुरेशी तर उपस्थिताचे आभार पूनम कपूर यांनी मानले. यावेळी क्लबच्या शंकुतला गोयल, सुनिता जयस्वाल, चंदा खांडरे, सीमा गर्ग, मिना गुप्ता, नंदा चवरे, अंजूम, प्रतीभा उदापूरे, संगीता त्रिवेदी, मीना अग्रवाल तसेच इनरव्हिल क्लब स्मार्ट सिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.